Bigg Boss Marathi 3 मध्ये सहभागी होण्याचा कोणताही प्लॅन नाही; अभिनेत्री केतकी चितळे ने केला खुलासा
आता तिसर्या पर्वात काय धमाल होणार? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
ग बॉस मराठी 3 ची घोषणा झाल्यापासूनच या सीझन मध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. दरम्यान यंदाच्या स्पर्धकांच्या यादी मध्ये अभिनेत्री केतकी चितळेच्या नावाची देखील मोठी चर्चा होती. पण केतकीने ही शक्यता फेटाळून लावली आहे. ईटी टाईम्स सोबत बोलताना केतकीने दिलेल्या माहितीनुसार, 'माझा बिग बॉस 3 मध्ये जाण्याचा कोणताच प्लॅन नाही. दरवर्षी बिग बॉसची घोषणा होताच माझं नाव का चर्चेमध्ये येतं? हेच मला कळत नाही' असा उद्विग्न प्रश्न देखील केतकीने विचारला आहे. Bigg Boss Marathi 3 ची घोषणा; इथे पहा टीझर (Watch Video).
दरम्यान केतकी चितळे 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतून घराघरात पोहचली होती. त्यानंतर एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान केतकी असणार्या एपिलेप्सी चा त्रास आणि त्यासोबत शूटिंगचा ताळमेळ न बसल्याने उडणारे खटके यावरून ती पुन्हा चर्चेत आली. सध्या सोशल मीडीयाच्या माध्यमातूनही केतकी एपिलेप्सी बाबत जनजागृती करण्याचं काम करत आहे.
केतकी चितळे
मीडीया रिपोर्ट्सनुसार, महिन्याभरातच बिग बॉस 3 मराठी हे पर्व टेलिव्हिजन वर येण्यास सज्ज होणार आहे. त्याचे प्रोमोज समोर येण्यास सुरूवात झाली आहे. यंदा देखील महेश मांजरेकर या सीझनच्या सूत्रसंचालकाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर अक्षया देवधर, नेहा जोशी, संग्राम समेळ हे चेहरे या पर्वात सहभागी होण्याची चर्चा रंगत आहे. पण अद्याप शो च्या फॉर्मेट नुसार स्पर्धकांची नावं गुलदस्त्यातच आहेत.
बिग बॉस 1 मेघा धाडे तर बिग बॉस 2 शिव ठाकरे याने जिंकला आहे. आता तिसर्या पर्वात काय धमाल होणार? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.