Bigg Boss Marathi 2 : पराग कान्हेरे बिग बॉसच्या घरातून आऊट होण्याचे संकेत; सहकारी महिला स्पर्धकाशी गैरवर्तन केल्याची चर्चा
मराठी दुरचित्रवाणी माध्यमातून छोटा पडदा व्यापण्यात Bigg Boss हा कलर्स मराठी वाहिनीवरील शो अल्पावधीतच बऱ्यापैकी यशस्वी झाला. यंदा या शोचे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे Bigg Boss Marathi 2 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांकडून प्रेक्षकांच्या अनेक आपेक्षा होत्या. मात्र, त्या पूर्ण करण्यात यशस्वी होण्याऐवज हे स्पर्धक बिगबॉस कुटुंबकलहामुळेच अधिक वादात सापडत आहे.
Bigg Boss Marathi 2 मधील स्पर्धक शिवानी सुर्वे (Shivani Surve) , अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि आता पराग कान्हेरे हे थेट नॉमिनेट न होता बिग बॉसच्या घराबाहेर पडणाऱ्या सदस्यांपैकी एक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवानी सुर्वे आणि अभिजित बिचुकले यांच्यानंतर आता पराग कान्हेरे (Parag Kanhere) बिग बॉसच्या घराबाहेर पडणार असे जवळपास नक्की झाल्याचे संकेत मिळत आहे. बिग बॉसच्या घरात कोणत्याही प्रकारच्या हिंसेला बंदी आहे. प्रत्येक स्पर्धकाला गृहप्रवेश करण्यापूर्वीच या नियमाची जाणीव करुन देण्यात येते. मात्र, खुर्चीसम्राट या टास्कवेळी बिग बॉसच्या घरात परागने नियमभंग केला. त्याने सहकारी स्पर्धक नेहा शितोळे (Neha Shitole) हिच्या कानशिलात लगावल्याने बिग बॉसने कारवाईचा बडगा उगारत त्याची घराबाहेर हकालपट्टी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. बिग बॉस कडून मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. पण, विकेंडच्या डावत मांजरेकरांच्या शाळेत शनिवारी किंवा रविवारी यावर खुलासा होऊ शकतो.
सदस्यांच्या आक्रमकतेमुळे बिग बॉसने टास्क थांबवला
बिग बॉसच्या घरात गुरुवारी स्पर्धकांना खुर्ची सम्राट हा टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये खुर्चीवर बसलेल्या स्पर्धकाला त्रस्त करुन खुर्चीवरुन उठून दुसरीकडे जाण्यास भाग पाडायचे होते. पहिला बझर ते दुसरा बझर असा या टास्कसाठी कालावधी होता. या वेळी शिव ठाकरे आणि किशोरी शहाणे विज यांनी हा टास्क पार पाडला. दरम्यान, या टास्कसाठी पराग कान्हेरे आला. त्याला खुर्चीवरुन उठविण्यासाठी इतर स्पर्धक प्रयत्न करु लागले. या वेळी काही स्पर्धकांनी अधिक आक्रमकता दाखवत परागला त्रास देणे सुरु केले. दरम्यान, पराग आणि घरातील इतर सदस्य एकमेकांविरोधात आक्रमक झाले. या वेळी झालेल्या झटापटीत पराग याने नेहा शितोळे या स्पर्धकाच्या कानशिलात लावल्याचे समजते. घरातील सदस्य आक्रमक झाल्याने बिग बॉसने हा टास्क थांबवला. टीव्हीवर गुरुवारी दाखवलेल्या भागात तर सर्व सदस्य आक्रमक झालेले दिसत आहेत. तसेच, त्यांच्यात काहीतरी भयंकर घडले आहे असे दिसते. मात्र, ते भयंकर नेमके काय? हे मात्र दाखवले नाही. त्यामुळे आजच्या भागात काय घडणार याबाबत उत्सुकता आहे.
कोण आहे पराग कान्हेरे?
पराग कान्हेरे हा व्यवसायाने शेफ आहे. बिग बॉसच्या घरात तो नेहमी चर्चेत असतो. टास्कमधील स्ट्रॅटेजी ठरवणं (ज्या अनेकदा फेल जातात), नेहमी एक वकिलाचा पवित्रा धारण करुन सोबतच्या स्पर्धकांना शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणं. तसेच, सहकारी स्पर्धक रुपाली भोसले हिच्यासोबतच्या मधूर संबंधामुळे चर्चेत राहणे, ही परागची बिग बॉसच्या घरातील काही वैशिष्टे राहिली आहेत. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2, 27 June, Episode 33 Updates: अनेक कॅमरे असूनही घरात घडली चोरी; परागला खाली ओढताना सदस्य झाले आक्रमक, बिग बॉसने रद्द केला टास्क)
खेळ कमी वाद अधिक
मराठी दुरचित्रवाणी माध्यमातून छोटा पडदा व्यापण्यात Bigg Boss हा कलर्स मराठी वाहिनीवरील शो अल्पावधीतच बऱ्यापैकी यशस्वी झाला. यंदा या शोचे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे Bigg Boss Marathi 2 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांकडून प्रेक्षकांच्या अनेक आपेक्षा होत्या. मात्र, त्या पूर्ण करण्यात यशस्वी होण्याऐवज हे स्पर्धक बिगबॉस कुटुंबकलहामुळेच अधिक वादात सापडत आहे. चर्चेचे कारण ठरल्याचे पाहायला मिळत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)