Bigg Boss Marathi 2, Episode 81 Preview: बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वातील विजेती मेघा धाडे सह 2 बंडखोर स्पर्धकांची घरात एन्ट्री, जुना गडी नवं राज्य या साप्ताहिक कार्यात नव्या स्पर्धकांसह जुने स्पर्धक घालणार धुडगूस
प्रेक्षकांची इच्छा आज पूर्ण होणार असून केवळ मेघा धाडे (Megha Dhade) या घरात प्रवेश करणार नसून रेशम टिपणीस (Resham Tipnis) आणि सुशांत शेलार (Sushant Shelar) या 2 बंडखोर स्पर्धकांसह घरात पाहुणे म्हणून एन्ट्री करणार आहे.
काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) च्या घरात पाहुणे म्हणून आलेले पहिल्या पर्वातील स्पर्धक पुष्कर जोग, सई लोकुर, शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता गोंदकर यांनी बीबी हॉटेल टास्कमध्ये घरातल्यांच्या अगदी नाकी नऊ आणले होते. त्यानंतर सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता होती ती पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे या घरात कधी येणार याची. प्रेक्षकांची इच्छा आज पूर्ण होणार असून केवळ मेघा धाडे (Megha Dhade) या घरात प्रवेश करणार नसून रेशम टिपणीस (Resham Tipnis) आणि सुशांत शेलार (Sushant Shelar) या 2 बंडखोर स्पर्धकांसह घरात पाहुणे म्हणून एन्ट्री करणार आहे.
या तिघांच्या येण्याने घरात नवीन बदल पाहायला मिळतील किंवा राडेही बघायला मिळतील हे वेगळं सांगायची गरज नाही. कारण रेशम, सुशांत आणि मेघा या तिघांच्या बंडखोर वृत्तीमुळे पहिला पर्व खूप गाजला होता. त्यात आता दुस-या पर्वात ह्या तिघांसह सध्याच्या स्पर्धकांना जुना गडी, नवं राज्य हे साप्ताहिक कार्य करावे लागणार आहे. त्यात पुन्हा एकदा स्पर्धक 2 गटात विभागले गेले असून त्यांच्यात बरीच तूतू-मैंमैं पाहायला मिळणार आहे. पाहा व्हिडिओ
तसेच आज होणा-या नवा गडी नवा राज्य या साप्ताहिक कार्यात पुन्हा एकदा शिव आरोह आमनेसामने येणार आहेत. यामध्ये कोणती टीम बाजी मारणार, तसेच आरोह आणि शिवमध्ये पुन्हा हाणामारी होणार, की जुन्या स्पर्धकांमध्ये वाजणार हे आजच्या भागात कळेलच.