Bigg Boss Marathi 2, Episode 61 Updates: 7/12 या साप्ताहिक कार्याचा दुसरा दिवस खेळापेक्षा अधिक वाद, बाचाबाची आणि हातापायीने रंगला
साप्ताहिक कार्याचा दुसरा दिवस खेळापेक्षा अधिक वाद, बाचाबाची आणि हातापायीने रंगलेला पाहिला मिळाला.
Bigg Boss Marathi 2, Episode 61 Highlights: आज बिग बॉस 2 (Bigg Boss Marathi 2) च्या घरात साप्ताहिक कार्य 7/12 चा दुसरा दिवस होता. आज टीम B शेतकरी झाली होती. तर टीम A मधील दोन सदस्य किटक, एक सदस्य मुकादम या भूमिकेत असणार होते. इतर सदस्यांनी टीम B ला आपले शेतीतील क्षेत्रफळ वाढवू न देण्यास विरोध करायाचा होता. आजही बिग बॉसने खेळाचे नियम समजावून सांगितले.
कार्याच्या पहिल्या राऊंडमध्ये टीम A मधून नेहा आणि माधव कीटकाच्या भूमिकेत होते. तर नेहाचं मुकादम होती. दुसऱ्या राऊंडमध्ये नेहा आणि शिव कीटक होते. तर तिसऱ्या राऊंडमध्ये माधव आणि रुपाली यांनी किटकाची भूमिका सांभाळली. पहिल्या राऊंडमध्ये टीम A मधील नेहा आणि शिवानी यांनी जमिनीच्या हिस्स्याच्या पाट्या बदलण्याची स्ट्रॅटजी वापरली. या स्ट्रॅटजीचे बिग बॉसने कौतुक केले असले तरी ती स्ट्रॅटजी गेमच बदलत असल्याने टीम A ला पुन्हा एकदा पाट्या होत्या तशा ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
तसंच छोटी रोपं म्हणून काही रोपं अमान्य करत नेहाने फळ्यावर रोपांचा आकडा लिहिला. यावरुन दोन्ही टीम्समध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर बिग बॉसने यावर निर्णय द्यावा अशी टीम B कडून विनंती करण्यात आली.
यावर दोन्ही सदस्यांनी सामंजस्याने रोपं मोजणीचा निर्णय घ्यावा, असे बिग बॉसकडून सांगण्यात आले. त्यावरुनही दोन्ही टीमच्या संचालिका किशोरी आणि नेहा यांच्यात बाचाबाची झाली. अखेर दोन राऊंट्स नंतर टीम B ला अनुक्रमे 114 आणि 76 रोपं वाचवण्यात यश आले. साप्ताहीक कार्य पूर्ण करताना होणारे वाद, बाचाबाची तर नेहमीच आहे. मात्र यंदा हातापायी, बळाचा वापर देखील झाल्याचे आरोप सदस्य एकमेकांवर करत होते. (Bigg Boss Marathi 2, Episode 61 Preview: टास्क दरम्यान गोदामामध्ये 'फुलांचा आकडा' मोजण्यावरून किशोरी-नेहा मध्ये बाचाबाची)
टास्कदरम्यान होणारी हातापायी पाहून शिवानीला खूप रडू आले. यावर टीम B मधील सदस्यांनी आपेक्ष घेतल्यावर मात्र शिवानीचा आवाज अधिकच चढला.
आजच्या दिवशी बिग बॉसच्या घरात वादावादी, मारहाण यांनी डोके वर काढले. शिव-हीना यांच्यात चांगलेच वाजले. तर शिवानी-वीणा यांच्यातही जोरदार वाद रंगला. इतकंच नाही तर नेहा, रुपाली, वीणा, हीना यांचाही आवाज आज चढला होता. घरात नुकताच दाखल झालेला आरोह देखील आज भलताच खवळला होता. त्याची शिवसोबतही जरा बाचाबाची झाली. मात्र नंतर एकमेकांची माफी मागत शिवानी-वीणा, आरोह-शिव यांनी आपापसातील भांडणं मिटवले.