Bigg Boss Marathi 2, Episode 61 Preview: टास्क दरम्यान गोदामामध्ये 'फुलांचा आकडा' मोजण्यावरून किशोरी-नेहा मध्ये बाचाबाची
गोदामात वाचवलेल्या फुलांची मोजणी करण्यावरून नेहा आणि किशोरी यांच्यामध्ये बाचाबाची होते.
बिग बॉस मराठी 2 च्या घरात सध्या '7/12' हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. या टास्क दरम्यान दोन गटामध्ये घरातील स्पर्धक एकमेकांविरूद्ध खेळत आहे. कीटक बनलेले सदस्य समोरच्या टीमकडून लावण्यात आलेल्या पीकाची नासाडी करत आहेत. यामध्ये पीकाची लागवड करणार्या सदस्यांना ती कीटकांपासून बचावण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. काल (24 जुलै) च्या एपिसोड एका टीमकडून खेळ पूर्ण झाला आहे. आता दुसरी टीम मैदानात उतरल्यानंतर स्वतःच्या पीकाचे रक्षण कसं करणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. पहा आजच्या भागात काय होणार?
बिग बॉसचं घर आणि वाद हे समीकरणच आहे. त्यामुळे घरात टिकण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करणं भाग आहे. यामध्ये दोन्ही टीमच्या मुकादमाच्या भूमिकेत असलेल्या किशोरी शहाणे आणि नेहा शितोळे हे सदस्य यांच्यामध्ये खडांजली रंगली आहे. गोदामात वाचवलेल्या फुलांची मोजणी करण्यावरून नेहा आणि किशोरी यांच्यामध्ये बाचाबाची होते. पहा आतापर्यंत काय झालंय बिग बॉस मराठी 2 च्या घरात
किशोरी शहाणे आणि नेहा शितोळे यांच्यामध्ये खडांजली
7/12 या खेळात टीम Aमध्ये नेहा, रुपाली, शिवानी, माधव, शिव, टीम B च्या वीणा, किशोरी, आरोह, अभिजीत, हीना विरोधात खेळत आहेत. शिवानी-हीना यांच्यातील वाद आता कायम पाहायला मिळणार असं सध्या तरी वाटतंय. कारण आजही घरातील, स्वयंपाक घरातील कामे यावरुन दोन्हींमध्ये चांगलाच वाद जुंपला. या वादात नॉमिनेट तर झाली आहेस आता घराबाहेरही जा, असेही शिवानी हिनाला म्हणाली. त्यामुळे आता हा वाद आजच्या भागात पुढे जाणार का? हे पाहणंदेखील उत्सुकतेचं ठरणार आहे.