Bigg Boss Marathi 2, August 19, Episode 86 Update: बिग बॉसच्या घरात रंगला आरोप प्रत्यारोपाचा खेळ, बिचुकले की अदालत मध्ये सदस्यांची शाळा
शिव आणि वीणा च्या भांडणाने आजच्या भागाची सुरुवात झाली. यानंतर बिग बॉस तर्फे घरातील सदस्यांना देण्यात आलेल्या 'बिचुकले की अदालत' नावाच्या टास्कमध्ये अभिजित बिचुकले हे घरातील सदस्यावर आरोप लावताना पाहायला मिळाले.
बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2 ) घरात आज एका नवीन आठ्वड्यासोबत नवीन ड्रामा सुरु झाला आहे. शिव (Shiv Thackrey) आणि वीणा (Veena Jagtap) च्या भांडणाने आजच्या भागाची सुरुवात झाली आणि त्यानंतर घरात आजवर लव्हबर्ड्स बनून वावरणाऱ्या या दोघांमध्ये फूट पडणार की काय असं वाटावं इतपत वाद वाढत गेला. मात्र नेहमीप्रमाणे शिवच्या समजावण्याने हे भांडण संपले. हा वाद संपतो तोवरच बिग बॉस तर्फे घरातील सदस्यांना एक नवीन टास्क दिले जाते. 'बिचुकले की अदालत' नावाच्या या टास्कमध्ये अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) हे घरातील सदस्यावर आरोप लावतात ज्यावर स्पष्टीकरण देऊन सदस्यांना आरोपांचे खंडन करायचे असते. घरात नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप लावणाऱ्या सदस्यांनी या टास्कमध्ये रंगत आणली. यामध्ये शिवानी (Shivani Surve) आणि वीणाचा एकमेकांवरील रोष पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आला.
घरात अभिजित बिचुकले हे अजूनही एका पाहुण्याच्या रूपात असल्याने बिग बॉस त्यांना नॉमिनेशन, एलिमिनेशन, किंवा सुरक्षित असण्यापासूनही दूर ठेवतात, त्यामुळे दोन आठवड्यांपासून त्यांना टास्कमध्ये संचालक, सल्लागार किंवा तत्सम भूमिका दिल्या जात आहेत. यामुळे आजही बिचुकले कि अदालत या टास्कमध्ये त्यांना सदस्यांना कोर्टात उभं करून प्रश्न करायचे होते. यावेळी इतर सदस्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातील सदस्याचे समर्थन किंवा प्रत्यारोप करण्याची देखील मुभा देण्यात आली होती. (माधव देवचके बिग बॉसच्या घरातुन बाहेर पडूनही ठरला 'विजेता', शोमॅन सुभाष घई यांच्या सिनेमात एंट्री)
यामध्ये शिवानी व वीणा वर तुम्ही वारंवार घरात वेगळ्याच ऍटीट्यूड मध्ये राहता असा आरोप लागवण्यात आला. तर नेहाला नेहमीप्रमाणे तू लोकांना आपल्या मुठीत ठेऊ पाहतेस असे ऐकवण्यात आले. शिवानी आणि वीणाने या टास्क मध्ये पुन्हा एकमेकींवर तोंडसुख घेत त्यांच्या चुकांची आठवण करून दिली, याशिवाय शिव आणि वीणा ला चिडवताना बिचुकले सतत त्यांच्या प्रेमसंबंधावर बोलताना पाहायला मिळाले मात्र यावेळेस त्या दोघांनीही हा विषय हसण्यावरी घेतला.
दरम्यान, पाहायला गेलं तर बिग बॉसच्या आजवरच्या टास्कमध्ये हा खेळ घरातील सदस्यांनी सर्वात जास्त सामंजसपणे व हसत खेळत खेळला गेला. अर्थात आता खेळ शेवटच्या टप्प्यात आला असताना आता हे घरातील सदस्यांना उशिराने सुचलेलं शहाणपण आहे की एखादी नवीन खेळी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.