Bigg Boss Marathi 2, 6 August, Episode 73 Updates: नेहा शितोळे बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन; संचालक हीनाने कॅप्टन्सी टास्कचा खेळखंडोबा केल्याने 'इम्युनिटी' रद्द
मात्र खेळाच्या अंतिम फेरीत तिने अनेकदा निर्णय बदलला. अखेर खेळ अनिर्णयित ठेवल्याने बिग बॉसने हीनाची इम्युनिटी काढून घेतली आहे.
Bigg Boss Marathi 2, 6 August, Episode 73 Highlights: बिग बॉस मराठी 2 च्या घरात आता खेळ जसा अंतिम टप्प्यात आला आहे तशी या खेळातील चुरस वाढायला सुरूवात झाली आहे. आज 11 व्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क सार्या स्पर्धकांसाठी होता. कॅप्टन्सी मिळवून पुढील आठवड्यासाठी इम्युनिटी मिळवण्यासाठी झटत असलेल्या स्पर्धकांना खांब खांब हे टास्क देण्यात आलं होतं. रूपाली भोसले मागील आठवड्यात आऊट झाल्यानंतर तिने हीनाला सेफ केलं होतं. त्यामुळे हीना या आठवड्यासाठी कॅप्टन्सी टास्कच्या संचालकपदी होती. मात्र खेळाच्या अंतिम फेरीत तिने अनेकदा निर्णय बदलला. अखेर खेळ अनिर्णयित ठेवल्याने बिग बासने हीनाची इम्युनिटी काढून घेतली आहे.
हीना ऐवजी बिग बॉसनेच निर्णय देत नेहा शितोळेला घराची पुढील आठवड्याची कॅप्टन बनवली आहे. कॅप्टन नेहाने घराची सूत्र हाती घेताच पुन्हा खटके उडायला सुरूवात झाली आहे. नेहा आणि शिवानी मध्ये वाद झाला असून अभिजीत बिचुकले आता यासाठी कारण ठरले आहेत. घरात टॉयलेट साफ करण्याची ड्युटी कुणाची यावरून रंग़लेला वाद घरात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरला. माधव घराबाहेर जाण्यामागे नेहाचं कारणीभूत असल्याचा ठपका लावत नेहा आणि शिवानीमध्ये मोठं भांडण रंगलं आहे. पहा आजपर्यंत काय घडलंय बिग बॉस मराठी 2 च्या घरात?
नेहा - शिवानी प्रमाणेच वीणा आणि किशोरी शहाणे यांच्यामध्येही टास्कदरम्यान झालेल्या स्ट्रॅटीजी आणि वैयक्तिक टिपण्णीवरून वाद झाला आहे. दरम्यान आरोह शिवानी आणि नेहामधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.