Bigg Boss Marathi 2, 24 July, Episode 60 Updates: हीना-शिवानी यांच्यात पुन्हा जुंपली; साप्ताहिक कार्यात दोन टीम्समध्ये रंगला वाद

साप्ताहिक कार्यात पुढे काय होणार? शिवानी-हिना वाद कुठंपर्यंत जाणार? का वीकेंडला महेश सर यांची शाळा घेणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2, 24 July, Episode 60 Highlights: काल झालेल्या नॉमिनेशन टास्कनंतर आज  बिग बॉस 2 (Bigg Boss Marathi 2) च्या घरात सात/बारा हे साप्ताहिक कार्य सदस्यांवर सोपवण्यात आले होते. यासाठी सदस्यांची दोन टीममध्ये विभागणी करण्यात आली. म्हणजेच टीम A आणि टीम B.

टीम A- नेहा, रुपाली, शिवानी, माधव, शिव.

टीम B- वीणा, किशोरी, आरोह, अभिजीत, हीना.

यापैकी आजच्या दिवशी टीम A शेतकरी भूमिकेत होती. तर टीम B मधील दोन सदस्य किटक, एक सदस्य मुकादम या भूमिकेत असणार होते. इतर सदस्यांनी टीम A ला आपले शेतीतील क्षेत्रफळ वाढवू न देण्यास विरोध करायाचा होता. विशेष म्हणजे खेळाच्या नियमांबद्दल सदस्यांचा गोंधळ उडाल्याने बिग बॉस यांनी पुन्हा एकदा नियम समजावून सांगितले.

आजच्या दिवशी या साप्ताहिक कार्याचे तीन राऊंड्स पार पडले. यातील पहिल्या फेरीत टीम B मधून आरोह आणि वीणा किटक होते. तर दुसऱ्या फेरीतही किटक म्हणून यांनीच भूमिका निभावली. तिसऱ्या फेरीत मात्र हिना आणि वीणा यांनी किटक होण्याची जबाबदारी सांभाळली. तर या तिन्हीही फेऱ्यांमध्ये किशोरी ताई मुकादमाच्या भूमिकेत होत्या.

दोन्हीही टीम्स आपल्या ट्रिक्स आणि स्ट्रॅटजीस वापरुन एकमेकांवर कुरघोडी करत खेळत होत्या. नेहमीप्रमाणेच खेळात वाद, बाचाबाची सुरु होती. मात्र शिवानी-हिना आणि रुपाली-वीणा यांच्यातील वाद, टोमणे अधिक पाहायला मिळाले. आज झालेल्या तीन राऊंड्समध्ये टीम A ला अनुक्रमे 66, 121 आणि 148  रोपे वाचवण्यात यश आले. पण यामागील नेहाची ट्रिक काहीशी वेगळीच होती. (Bigg Boss Marathi 2, Episode 60 Preview: शिवानी धरणार नेहाशी अबोला, साप्ताहिक कार्यात शिव- हीना मध्ये सुद्धा होणार खडाजंगी)

शिवानी-हीना यांच्यातील वाद आता कायम पाहायला मिळणार असं सध्या तरी वाटतंय. कारण आजही घरातील, स्वयंपाक घरातील कामे यावरुन दोन्हींमध्ये चांगलाच वाद जुंपला. या वादात नॉमिनेट तर झाली आहेस आता घराबाहेरही जा, असेही शिवानी हिनाला म्हणाली.

शिवानीचं भांडण फक्त हीनाशीच नाही. तर नेहाशी देखील तिची आज  बाचाबाची झाली आणि यानंतर तिने नेहाशी एकही शब्द न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. पण तो कुठंवर टिकतो, ते कळेलंच.

साप्ताहिक कार्यात पुढे काय होणार? आणि शिवानी-हीना वाद कुठंपर्यंत जाणार? का वीकेंडला महेश सर यांची शाळा घेणार?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.