Bigg Boss Marathi 2, 21 July, Episode 57 Updates: 'बिग बॉस'च्या घरातून वैशाली माडे आऊट; भांडण, डान्स सह महेश मांजरेकर यांच्या शाळेत रंगला वीकेंडचा डाव
बिग बॉसच्या घरातील वैशालीचा सुरेल प्रवास संपुष्टात आला असून त्यासोबतच घरात किशोरी आणि रुपालीमध्ये नवीन वादाला सुरुवात झाली आहे.
Bigg Boss Marathi 2, 21 July, Episode 57 Highlights: बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2) घरात आपल्या सुरांची जादू पसरवणाऱ्या वैशाली माडे (Vaishali Mhade) हिचा सुरेल प्रवास आज संपुष्टात आला आहे, आजच्या वीकेंडच्या डाव (Weekend Cha Daav) मध्ये घरातील अन्य सदस्यांचा निरोप घेऊन वैशालीने घरातून एग्झिट घेतली आहे. नेहमीप्रमाणे अभिजीत (Abhijit Kelkar) , हीना (Heena Panchal) यांनी भरल्या डोळ्यांनी वैशालीला निरोप दिलाच पण घरातून बाहेर पडून जेव्हा वैशाली टीव्हीच्या स्क्रीनवरून घरातील सदस्यांसमोर आली आणि तिने सुन्या सुन्या मैफलीत माझ्या हे गाणे गेले तेव्हा अक्षरशः नेहाला (Neha Shitole) सुद्धा अश्रू अनावर झाले, या प्रसंगावरून घरातील सदस्य एकमेकांची कितीही भांडत असले तरी त्यांच्यात एक भावनिक दुवा आहे याचे दर्शन घडले. असं असलं तरी, वैशाली घरातून बाहेर पडताच घरात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे, आणि या वादात इतर कोणी नाही तर, घरातील सर्वात जुना गट KVR म्हणजेच किशोरी (Kishori), वीणा (Veena) आणि रुपाली (Rupali) यांच्यातील सर्व दुवे संपून आता खऱ्या अर्थाने शाब्दिक लढाई सुरु झाली आहे .
या भांडणात किशोरी मांजरेकर यांच्याकडे तक्रार करताना,रुपालीने आपल्याला बिंडोक म्हंटल्याचा राग व्यक्त केला तर यावर रुपाली आपली बाजू मांडून किशोरींचे बोलणे पूर्णतः फेटाळून लावते. मात्र यामुळे आणखीनच चिडलेल्या किशोरी या रुपालीने मर्डर मिस्ट्री टास्क दरम्यान स्वतःच कसा प्रताप केला होता असे दाखले देत आपल्याला बिनडोक म्हणायचे काहीच कारण नाही अशी भूमिका घेतली होती. Bigg Boss Marathi 2: माधव देवचक्के यालाच करा बिग बॉसचा विजेता, राखी सावंत हिचे चाहत्यांना वोट अपील (Watch Video)
दरम्यान, दर वीकेंडच्या डावाला घरातील सदस्यांना काहीतरी मजेशीर खेळ खेळवून जवळ आणण्याचा प्रयत्न बिग बॉस करत असतात, त्यानुसार आजही ईमोजी वरून गाणी ओळखण्याचा खेळ खेळला गेला होता , यामध्ये माधव-हीना, तसेच रुपाली आणि वीणाला डान्स करण्यास सांगितले जाते, यात हिनाचा हॉट अंदाज पाहून सर्वच जण थक्क होतात. पण ही सर्व गंमत संपते ना संपते तोवरच किशोरी आणि रुपालीच्या वादाला सुरुवात होते.