Bigg Boss Marathi 2, 14 June, Day 20 Episode Updates: पराग - वीणामध्ये पाणी वापरावरून रणकंदन
मागील काही दिवसांपासून घराबाहेर पडण्याचा हट्ट आणि धमक्या देणार्या शिवानीने खेळात कायम आहे.
बिग बॉस मराठी 2 च्या घरात आज 'शाळा सुटली पाटी फुटली' हे आणि 'पाणी जपून वापरा' अशी दोन टास्क रंगली. बाप्पा जोशीच्या वर्गात अभिजित बिचुकले यांच्या कवितांचे रसग्रहण हा तास रंगला. यादरम्यान शिव आणि वीणाच्या वैयक्तिक टिपण्णीमुळे सकाळपासून संयम ठेवलेल्या अभिजीत बिचुकले यांचा ताबा सुटला. रागाच्या भरात त्यांनी काही अपशब्द वापरले. मात्र घरातील सदस्यांनी त्यांना शांत करून टास्क सुरळीत नेण्याचा प्रयत्न केला. शाळा सुटली पाटी फुटली या कार्याचा परिणाम कॅप्टन्सीच्या दृष्टीने मह्त्त्वाचा आहे. त्यानुसार, टीम ए मधून दिगंबर नाईक तर टीम बी मधून वैशाली माडेची निवड झाली आहे. आता या दोघांमधून एकाची निवड घराचा पुढील कॅप्टन म्हणून होणार आहे.
दिवसभराचा आडावा घेताना पराग,किशोरी आणि रूपाली यांना वीणा त्यांच्या ग्रुपमधून फुटतेय असं वाटल्याने पराग आणि वीणामध्ये काही खटके उडाले. वीणाच्या मते पराग ग्रुप डॉमिनेट करत आहे.
बिग बॉसच्या घरातील दुसरा दिवस हा पाणीबाणीचा ठरला. घरात सदस्यांना पाणी पुरवठा बंद करून केवळ मर्यादीत पाण्याचा वापर करून टास्क जिंकायचं होतं. त्यानुसार टीम बीमध्ये पराग आणि सुरेखा पुणेकर यांनी पाण्याचा वापर केल्याने त्यांच्या हातामधून खेळ गेला. मात्र टीम एच्या स्पर्धकांनी संयम ठेवत पाण्याचा वापर आणि अपव्यय टाळला.
दरम्यान आजच्या भागात शिवानी सुर्वेच्या चाहत्यांना दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांपासून घराबाहेर पडण्याचा हट्ट आणि धमक्या देणार्या शिवानीने खेळात कायम राहण्याची आणि पुन्हा तक्रारीला जागा देणार नसल्याची ग्वाही दिली आहे. तिच्यामध्ये नेमका का बदल कसा झाला यासाठी उद्या (15 जून) दोन तासांचा विशेष विकेंडचा डाव बघावा लागणार आहे.