Bigg Boss Marathi 2, 10 August, Episode 77 Updates: महेश मांजरेकर यांनी अभिजित केळकरची घेतली शाळा, शिवानी आणि नेहाचा वाद अद्याप सुरुच

मात्र त्यांना एखाद्याने काम करण्यात सांगितल्यास ते त्याच्यावर संताप व्यक्त करताना दिसून येतात. असाच प्रकार त्यांना बाथरुम साफ करतानाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र ती योग्य पद्धतीने पार न पाडल्याने त्यांच्या विरोधात तक्रार कप्तान नेहा हिच्याकडे करण्यात आली.

Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉसच्या घरात बिचुकले यांच्या एन्ट्रीनंतर घरातील वातावरण खेळीमेळीचे झाले आहे. मात्र त्यांना एखाद्याने काम करण्यात सांगितल्यास ते त्याच्यावर संताप व्यक्त करताना दिसून येतात. असाच प्रकार त्यांना बाथरुम साफ करतानाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र ती योग्य पद्धतीने पार न पाडल्याने त्यांच्या विरोधात तक्रार कप्तान नेहा हिच्याकडे करण्यात आली. तर दुसऱ्या बाजूला शिव आणि वीणा हे दोघेच बिग बॉसच्या घरात असल्यासारखे वागताना सध्या दिसून येतात. त्यानंतर विकेंडच्या डाव मध्ये स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी महेश मांजरेकर येताच त्यांनी कप्तानपदासाठी देण्यात आलेल्या टास्कदरम्यान झालेल्या गोंंधळाबद्दल सदस्यांना विचारतात. हिना हिला त्या टास्कवेळी सूत्रसंचालनाचे काम सोपण्यात आले होते तरीही ती अनफेअर पद्धतीने वागली असल्याचे तिला सांगण्यात आले. त्याचसोबत अभिजित केळरसुद्धा संपूर्ण आठवडा अनफेअर खेळल्याचे महेश सरांनी त्याला सुनावले.

शिवानी आणि नेहामध्ये झालेल्या वादानंतर शिवानीचा पुन्हा एकदा राग बिग बॉसच्या घरात दिसून आला. तर नेहाच्या बोलण्याचा वरचढ आवाज हा नेहमीच दिसून येतो आणि माधव तिच्यामुळेच घरातून बाहेर पडल्याचा आरोप तिने लगावला होता असल्याची कबुली तिने महेश मांजरेकर यांना दिली. अभिजित जर काही बोलला त्याचे प्रतिसाद किशोरीमध्ये दिसून येतात असे तिला सांगण्यात आले. तर आरोह याच्यावर अभिजित आणि किशोरी यांनी केलेल्या टीकेमुळे त्यांची शाळा घेण्यात आली. अभिजितने नेहा, शिवानी आणि आरोह हे सर्वजण बिनडोक असल्याचे वक्तव्य केल्याने महेश सरांनी त्याला हा गेम फक्त तुलाच कळतो का? अशा शब्दांत त्याची कानउघडणी केली. तर नॉमिनेशनच्या टास्कदरम्यान वीणाने किशोरीवर केलेल्या टीकांचे स्पष्टीकरण देत नेमक काय सत्य आहे याबद्दल उघड केले.

हिनाला सुद्धा महेश मांजरेकर यांनी टास्कदरम्यान कोणावरही विश्वास न ठेवण्याच्या प्रकारावरुन तिच्यावर संताप व्यक्त केला. तसेच आरोह सोबत अद्याप बोलणे झाले नसल्याने हिनाने तिच्याबद्दल व्यक्त केलेल्या विधानांवरुन तिला खडे बोल सुनावले आहेत. तर अभिजितचे एकूणच आठवड्यातील वागणूक पाहता त्याला आरोपी बिग बॉसच्या एका फॅनकडून ठरवण्यात आले. तसेच त्याला घरातल्या सदस्यांच्याभोवती बेडूकउड्या मारण्यास सांगितल्या.