Bigg Boss Marathi 2, 04 August, Episode 71 Update: या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून रुपाली बाहेर; महेश मांजेरकर यांनी सांगितला रीमा लागू यांचा हळवा किस्सा
शिव जेव्हा याबद्दल जाब विचारतो तेव्हा नेहमीप्रमाणे ते विषय भरकटत घेऊन जातात. अखेर या आठवड्यात रुपाली बिग बॉसच्या घरातून बाहेर पडते. जाताना ती पुढील आठवड्यासाठी हिनाला सुरक्षित करते.
एपिसोडची सुरुवात वीणा आणि शिव यांची चेष्टा करण्याने होते. शिवची आई व बहिण बाहेर जाताना वीणाला फ्रीझ करण्यात आले होते, त्यावरून तिची चिडचिड झाली होती. याबद्दल महेश मांजरेकर तिची थोडी खेचतात. त्यानंतर परत नेहमीप्रमाणे चर्चा बिचुकले आणि त्यांनी वापरलेल्या वाईट शब्दांवर येते. यावेळी नेहा बिचुकले यांच्याबद्दल तक्रार करते. त्यानंतर आजच्या मैत्रीदिनी एका खास सेगमेंटची सुरुवात होते. किशोरी शहाणे यांना त्यांच्या एका मैत्रिणीने दिलेल्या खास शुभेच्छा दाखवल्या जातात. आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री अलका कुबल किशोरी शहाणे यांच्याबद्दल चार चांगले शब्द बोलून या घरात राहण्यासाठी शुभेच्छा देते.
त्यानंतर अभिजितला त्याची मैत्रीण ऋजुता देशमुख शुभेच्छा देते. आजच्या मैत्रीदिनी महेश मांजरेकर त्यांची जवळची मैत्रीण रीमा लागू यांच्याबद्दल एक भावनिक किस्सा सांगतात. पुढे शिवानीसाठी तिचा बॉयफ्रेंड अजिंक्य मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर हीनाला तिची मैत्रीण सायरा शुभेच्छा देते. वीणाला अक्षरा गुरव शुभेच्छा देते. आरोह्लाही त्याचा मित्र शुभेच्छा देतो. नेहाला तिचा मित्र जितेंद्र तर शिवला त्याचा अमरावतीचा मित्र शुभेच्छा देतो. (हेही वाचा: मराठी बिग बॉस कार्यक्रमात प्रोमोज, रिकॅपचा मारा; रसभंग झाल्याने प्रेक्षक नाराज)
त्यानंतर एक चाहती येऊन शिव आणि वीणा यांना दोषी ठरवले जाते. शिक्षा म्हणून दोघांनाही एकमेकांचे दोष सांगायला लावले जाते. मात्र दोघेही सांगू शकत नाहीत. त्यानंतर चुगली बूथ मध्ये पहिली चुगली शिवला बिचुकले यांच्याबद्दल ऐकवली जाते. शिव जेव्हा याबद्दल जाब विचारतो तेव्हा नेहमीप्रमाणे ते विषय भरकटत घेऊन जातात. अखेर या आठवड्यात रुपाली बिग बॉसच्या घरातून बाहेर पडते. जाताना ती पुढील आठवड्यासाठी हिनाला सुरक्षित करते.