Bigg Boss 13: जाणून घ्या सिद्धार्थ शुक्ला ला का करण्यात आले हॉस्पिटल मध्ये दाखल (Watch Video)
त्याने यातून लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा घरात प्रवेश घ्यावा यासाठी त्याला सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले होते.
Siddharth Shukla Admitted To Hospital: बिग बॉस 13 मधील स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला याला टायफॉईड झाला आहे. त्याने यातून लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा घरात प्रवेश घ्यावा यासाठी त्याला सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले होते. परंतु, त्याची प्रकृती अधिक खालावली आणि म्हणूनच सिद्धार्थला त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच रुग्णालयात दाखल करावे लागले.
गुरुवारी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी बिग बॉस 13 चा भाग संपल्यानंतर, प्रिव्हयुमध्ये दाखवण्यात आले की बिग बॉस सिद्धार्थ शुक्लाला सीक्रेट रूम सोडण्यास सांगतात व त्यांना रुग्णालयात दाखल करणार असल्याचेही सांगतात. बिग बॉस म्हणतात, "सिद्धार्थ तुमच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला काही काळासाठी रुग्णायात दाखल करण्यात येणार आहे, ज्यासाठी तुम्हाला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागणार आहे."
गेल्या आठवड्यात सिद्धार्थला टायफॉइडचे निदान झाले होते आणि योग्य देखरेखीखाली त्याला BB घरात सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले. पण, प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला रुग्णालयात हलवावे लागले.
Bigg Boss 13: सलमान खान आजारपणामुळे सोडणार शो? फराह खान असू शकते नवी होस्ट
दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला यांच्यासोबत पारस छाबरा याला देखील सिद्धार्थ शुक्ला सोबत सीक्रेट रूम मध्ये ठेवण्यात आलं होतं. परंतु, पारसने आता पुन्हा घरात प्रवेश केला आहे. त्याने सिक्रेट रूममध्ये असताना एकमेकांच्या पाठीमागे इतर लोक काय बोलतात हे जाणून घेतला.