Bigg Boss 13 Protest: बिग बॉस 13 च्या 'Bed Friends Forever'या कन्सेप्टला करणी सेनेचा विरोध, सलमान खानच्या घराबाहेर घोषणाबाजी करणा-या 20 जणांना अटक

त्याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील घराबाहेर घोषणाबाजी करणा-या 20 जणांना अटक केली आहे.

Bigg Boss 13 House (Photo Credits: IANS)

कलर्स वाहिनीव सध्या सुरु असलेला लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) सध्या वादाच्या भोव-यात अडकत चालला आहे. हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच अवघ्या दुस-या आठवडयापासून वादाच्या भोव-यात अडकत चालला आहे. हा कार्यक्रम वादाच्या भोव-यात अडकण्याचे कारण हे यातील स्पर्धक नसून या कार्यक्रमात असलेल्या 'Bed Friends Forever' हा कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टमुळे या कार्यक्रमात बेडवरील बरेच अश्लील चाळे दाखवले जातात. भारतीय संस्कृतीसाठी हा अतिशय लज्जास्पद प्रकार असून हा कार्यक्रम बंद करावा या साठी करणी सेना आंदोलन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील घराबाहेर घोषणाबाजी करणा-या 20 जणांना अटक केली आहे.

या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच राजस्थानमधील करणी सेनेकडून विरोध होत आहे. करणी सेनेने त्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यामुळे या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खान च्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. शुक्रवारी सलमानविरुद्ध आणि या कार्यक्रमाविरुद्ध सलमानच्या घराबाहेर आंदोलन करणा-या 20 जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. हेदेखील वाचा- Bigg Boss 13: मुले-मुली एकाच बेडवर झोपत असल्याने करणी सेना आक्रमक; शो बंद करण्याची केली मागणी

बॉलिवूड हंगामा ने दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या घराबाहेर उपदेश राणा हा व्यक्ती व्हिडिओच्या माध्यमातून सलमानला आणि या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना बिग बॉस 13 मध्ये आक्षेपार्ह गोष्टी दाखवू नये असा इशारा देताना दिसत आहे.

इतकच नव्हे तर करणी सेनेने प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना 'बिग बॉस 13 हा भारतीय संस्कृतीला आणि परंपरेला काळिमा फासणारा कार्यक्रम असून त्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी' अशी मागणी केली आहे.