Best Marathi TV shows 2019: 'बिग बॉस मराठी 2' ची अतरंगी दुनिया ते 'अग्गंबाई सासूबाई' मधील सासूसुनेचं विलक्षण नातं, हे आहेत 2019 मधील Top 10 मराठी शो
'बिग बॉस मराठी 2' (Bigg Boss Marathi 2) च्या अतरंगी दुनियेपासून ते 'अग्गंबाई सासूबाई'(Agga Bai Sasubai) मधील सासूसुनेचं विलक्षण नात्यापर्यंत, हे आहेत मराठी टेलिव्हिजन विश्वातील Top 10 मराठी शो.
Best Marathi TV shows 2019: मराठी मनोरंजन विश्वात टेलिव्हिजन हा एक अविभाज्य घटक आहे कारण मराठी माणूस हा दैनंदिन मालिकांसोबत जास्त जोडला गेलेला आहे. संध्याकाळी अगदी होम मिनिस्टर (Home Minister) पासून सुरु होणारं टीव्ही शोझचं सत्र रात्रीस खेळ चाले 2 (Ratris Khel Chale 2) पर्यंत सुरु असतं. काही मालिकांचं कथानक नवनवी रहस्य उलगडतात तर काह मालिका या अगदी हलकीफुलक्या पण तितक्याच मनोरंजक असतात. 'बिग बॉस मराठी 2' (Bigg Boss Marathi 2) च्या अतरंगी दुनियेपासून ते 'अग्गंबाई सासूबाई'(Agga Bai Sasubai) मधील सासूसुनेचं विलक्षण नात्यापर्यंत, हे आहेत मराठी टेलिव्हिजन विश्वातील Top 10 मराठी शो.
बिग बॉस मराठी 2
बिग बॉस मराठीचा सिझन 2 सिझन 1 प्रमाणेच हिट ठरलं. शिव वीणाची लव्ह स्टोरी ते अभिजीत बिचुकलेनुसारखं अतरंगी व्यक्तिमत्त्व, या सर्वच गोष्टी या वेळी चर्चेचा विषय ठरल्या. सिझन 2 कधी येणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच होती, परंतु यावर्षी हा सिझन थोडा उशिरानेच चालू झाला. विशेष ठरलं ते यावर्षीचं घर जे लोणावळ्याहून मुंबईत हलवण्यात आलं होतं. अखेर सर्व कलाकारांना मागे टाकत शिव ठाकरेला प्रेक्षकांनी विजयी केलं.
अग्गंबाई सासूबाई
तेजश्री प्रधान ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री या शोच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली. होणार सून मी या घरची मालिकेतील जान्हवीचं पात्र जरी लोकांच्या मनात अजूनही तितकंच जिवंत असलं तरी प्रेक्षकांनी शुभ्रला देखील तितक्याच प्रेमाने स्वीकारलं. सासू सूनेतील भांडणं आणि कटकारस्थानं न दाखवता, त्या दोघींमधील नातं किती गोड असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई'. निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना तितकीच आवडत आहे.
मिसेस मुख्यमंत्री
मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या रूपाने प्रेक्षकांसमोर झी मराठी वाहिनीने आणला एक वेगळा विषय आणि एक नवी लव्ह स्टोरी. गावरान सुमीची हटके अदाकारी आणि मानाने साधा असा समर यांच्यातील नात्यात एक गोडवा पाहायला मिळतो. आणि या गोड नात्यात, समरच्या आईने आणलेला तिखटपण देखील तितकंच मजेशीर वाटतो.
रात्रीस खेळ चाले 2
भयकथेवर आधारित अशी सस्पेन्स मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले. त्या मालिकेला मिळालेल्या यशानंतर त्याचं सिझन 2 तयार करायचं ठरलं. परंतु हा सिझन सिक्वेल नसून गोष्टीचा प्रिक्वेल आहे. बघता बघता हा सिझन इतका हिट झाला की शेवंता आणि अण्णा यांची जोडी निगेटिव्ह असून देखील प्रेक्षकांना आवडू लागली. त्यातही विशेष कौतुक करायचं झालं तर अपूर्व नेमळेकरने साकारलेली शेवंता.
हे मन बावरे
अनुश्री आणि सिद्धार्थ या जोडीतील निरागस प्रेमाची परिपक्व गोष्ट म्हणजे 'हे मन बावरे'. मराठीतील चॉकलेट बॉय म्हणजेच शशांक केतकर या मालिकेत सिद्धार्थची भूमिका साकारत आहे तर मृणाल दुसानिस ही अनुश्रीचं पात्र साकारातने दिसते. दोघांमधली ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी मस्त आहे की कोणीही या मालिकेच्या प्रेमात पडेल.
जीव झाला येडापीसा
एकमेकांच्या जीवावर उठलेल्या दोन व्यक्ती प्रेमात कशा पडू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'जीव झाला येडापीसा'. मालिकेत सिद्धी आणि शिवाच्या रूपात दोन नवे चेहरे पाहायला मिळतात. गावरान बाजाच्या या मालिकेत ड्रामा, ऍक्शन, लव्ह सगळंच पाहायला मिळतं.
स्वराज्यरक्षक संभाजी
ही मालिका सुरु होऊन 2 वर्ष जरी झाली असली तरी आजही टॉप 5 मालिकांमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी या शोचं नाव असतंच. इतिहासातील सुवर्णकाळ उलगडणारी संभाजी महाराजांची शौर्यगाथा म्हणजे ही मालिका. इतिहासाचा अचूक अभ्यास करत या मालिकेचं लिखाण करण्यात आलं आहे. अमोल कोल्हे यांनी संभाजी राजांचं पात्र उत्कृष्टपणे साकारलं आहे. तसेच प्राजक्ता गायकवाड हिने येसूबाईंचं पात्र साकारताना उल्लेखनीय कामगिरी केलेली दिसून येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण जीवनचरित्र दाखवणारी मालिका म्हणजे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर'. सागर देशमुख या माळीखेत प्रमुख भूमिकेत दिसतो तर शिवानी रंगोले ही बाबासाहेबांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसते. या मालिकेचे वैशिट्य म्हणजे बाबासाहेबांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा यात घेतला जात आहे.
सिंधू
एकोणिसाव्या शतकातील एका निरागस आणि गोड मुलीचा उत्कट प्रवास दाखवण्यात आला आहे. लहानग्या वयात संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या या सिंधूची असामान्य गोष्ट या मालिकेत मांडण्यात आली आहे. अदिती जलतारे ही बाल अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारताना दिसते.
होम मिनिस्टर
गृहिणींना आपल्या दैनंदिन आयुष्यात चार क्षण विरंगुळ्याचे मिळावेत या उद्दिष्टाने हा शो सुरु करण्यात आला होता. आणि बघता बघता या शो चा प्रवास 15 वर्षांचा कसा झाला हे कळलं देखील नाही. आजही आदेश भावोजी महाराष्ट्रातील वहिनींमध्ये तितकेच हिट आहेत आणि प्रत्येक गृहिणीच्या मनात पैठणीची ओढही तितकीच दिसून येते जेवढी त 15 वर्षांपूर्वी होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)