Pallavi Dey Dies by Suicide: बंगाली अभिनेत्री पल्लवी डे चा मृत्यू; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
या बातमीने तिचे सहकलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Pallavi Dey Dies by Suicide: टीव्ही शो ‘Mon Mane Na’ मध्ये मुख्य भूमिकेत असलेली बंगाली अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Dey) कोलकाता येथील गरफा येथील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय अभिनेत्रीचा आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. पल्लवीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिला तात्काळ बांगूरच्या रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या कठोर पाऊलामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
पल्लवीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या बातमीने तिचे सहकलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘मोन माने ना’ मध्ये काम करणारी को-स्टार अनमित्रा बताब्याल (Anamitra Batabyal) या बातमीने थक्क झाली आहे. ती म्हणाली, “मला प्रचंड धक्का बसला आहे. आम्ही 12 मे रोजी टेलिव्हिजन शोसाठी शूटिंग केले आणि नंतर तिच्याशी गप्पा मारल्या. मला अजूनही बातम्यांवर विश्वास बसत नाही.” (हेही वाचा - Mahhi Vij Received Rape Threats: कार अपघातानंतर माही विजला बलात्काराची धमकी; अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलिसांना मागितली मदत)
अजून एका टीम सदस्याने सांगितले की, “ती दोन दिवसांपूर्वी शूटला गेली होती. आम्हाला कल्पना नव्हती की, ती कशामुळे उदास किंवा अस्वस्थ आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही की ती नाही आहे.”
टेलिव्हिजन मालिका ‘Resham Jhanpi’ मध्ये भूमिका साकारून पल्लवी घराघरात प्रसिद्ध झाली. तिने टीव्ही प्रोजेक्ट ‘Ami Sirajer Begum’ मिळवला, ज्यात सीन बॅनर्जी मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्री सध्या 'मोन माने ना' मध्ये मुख्य भूमिकेत होती, ज्यामध्ये Samm Bhattacharya पुरुष मुख्य भूमिकेत होते. तर अभिनेत्री अंजना बसू शोमध्ये नकारात्मक भूमिकेत आहे. पल्लवीच्या निधनाने तिच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.