‘HotShots’ वेबसिरीज अॅपवर येणार बंदी? वेबमिडिया आसोसिएशन चे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार
ज्याला देशातील युवा पिढी भुलत आहे. या शॉर्ट फिल्म डाऊनलोड करण्यासाठी युजर्सकडून पैसेही उकळले जात आहेत, या सर्व प्रकाराची चौकशी करावी यासाठी वेब मिडिया असोसिएशन मुंबई प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
डिजिटल इंडियाच्या युगात इंटरनेटचा वापर चांगल्या कामासाठी करण्याऐवजी देशातील युवा पिढी भलत्याच कामांसाठी करत असल्याचे दिसत आहे. याला सर्वस्वी जबाबदार बॉलिवुडमधील 'प्रोड्युसर माफिया गँग' आहे. विदेशात सुरु केलेले ‘हॉटशॉर्टस’ (HotShots) वेबसिरीज अॅप हा त्यातलाच भाग असल्याची शंका घेण्यास वाव आहे. या वेबसिरीज अॅपच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या शॉर्ट फिल्म अश्लील आहेत. ज्याला देशातील युवा पिढी भुलत आहे. या शॉर्ट फिल्म डाऊनलोड करण्यासाठी युजर्सकडून पैसेही उकळले जात आहेत, या सर्व प्रकाराची चौकशी करावी यासाठी वेब मिडिया असोसिएशन मुंबई प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन (Anil Mahajan) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
अनिल महाजन यांनी माहिती देताना सांगितले की, या हॉट शॉट्स इंटटेमेंट वेबसिरीज अॅपच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या शॉर्ट फिल्म अश्लील आहेत. या वेब सिरीजच्या माध्यमातून देशातील युवा पिढीवर चुकीचे संस्कार होत आहेत.काही बॉलिवूड प्रोड्युसर माफिया हा स्वत:चा व्यवसाय वाढवण्यासाठी या गोष्टींचा वापर करत आहे. परंतू, देशहीत लक्षात घेता त्याला कोणी थांबवणार आहे की नाही? असा सवालही अनिल महाजन यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या काही सजग लोकांनी वेब मीडिया असोसिएशन अध्यक्ष अनिल महाजन यांच्या कार्यालयात तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत अनिल महाजन यांनी सांगितले की, ‘माहिती प्रसारण मंत्रालयाकडून ‘हॉटशॉर्टस’ या वेब सिरीज ॲपला कायदेशीर परवानगी मिळाली आहे का? असेल तर त्याची कॉपी वेब मीडिया असोसिएशन कडे देण्यात यावी. दरम्यान, विदेशी नागरिकत्वाचा फायदा घेत काही प्रोड्युसर माफिया गेंग कडून मनीलॉण्ड्रींगही होत असण्याची शक्यता आहे.’
पुढे बोलताना अनिल महाजन म्हणाले, ‘हॉटशॉर्टस’ ॲप बेकायदेशीर आहे. याबाबत आम्ही वेब मिडिया असोसिएशन मुंबई तर्फे केंद्रीय मंत्री माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्र पोलीस महासंचालक एस. के. जैस्वाल यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करणार आहे. तसेच, ‘हॉटशॉर्टस’ या ॲपवर भारतात बंदी घालण्यात यावी याबाबत वेबमिडिया असोसिएशन मुबंई च्या वतिने पत्रकार परिषद घेऊन कार्यवाही करणे बाबत मागणी करण्यात येईल व तक्रार करून पाठपुरावा करण्यात येणार आहे.’ असेही महाजन म्हणाले.