The UP Files Movie Box Office Collection: 'द यूपी फाइल्स' सिनेमाने एकाच आठवड्यात जमावला 16 कोटींचा गल्ला
या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची कमाई केली आहे.
The UP Files Movie Box Office Collection: 'द यूपी फाइल्स' (The UP Files) सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची कमाई केली आहे. दुसऱ्याच दिवशी या सिनेमाने जवळपास 3 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. सिनेमाने एकाच आठवड्यात 16 कोटींचा गल्ला जमावला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या कामावर द युपी फाईल्स हा सिनेमा आधारित आहे. संपूर्ण भारतात 400 पेक्षा जास्त सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट दाखवला जात आहे. सिंगल स्क्रीनमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. फक्त उत्तर प्रदेशात 100 पेक्षा जास्त सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट चालत आहे. (हेही वाचा: Bhool Bhulaiyaa 3: 'भूल भुलैया 3' चित्रपटाची शूटिंग बाबत मोठी अपडेट समोर; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला)
अहमदाबाद, चेन्नई, उदयपूरमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपट पाहत आहेत. मनोज जोशी, मंजरी फडनीस आणि मिलिंद गुणाजी यांसारख्या कलाकारांची तगडी टीम सिनेमात पहायला मिळाली. चित्रपटात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भूमिका अभिनेते मनोज जोशी यांनी साकारली आहे.
चित्रपटाची कमाई
या सिनेमाने पहिल्याच दिवशी, 2.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 कोटी रुपयांची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी 4 कोटी 25 लाख रुपयांचा गल्ला या सिनेमाने जमावला. दरम्यान हा सिनेमा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही 100 पेक्षा जास्त सिनेमागृहांमध्ये चालत आहे.
पोस्ट पहा
हे कलाकार सिनेमात
चित्रपट "द यूपी फाइल्स" मध्ये सर्व कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना आवडत आहे. दिग्दर्शक नीरज सहाय यांची कथा सांगण्याची कला आणि सादरीकरण लोकांना आकर्षित करत आहे. निर्माता कुलदीप उमरावसिंह ओस्टवाल यांच्या पहिल्या प्रयत्नाला अपार प्रशंसा मिळत आहे. चित्रपटात मनोज जोशी, मंजरी फडनीस, मिलिंद गुणाजी यांच्या व्यतिरिक्त अवतार गिल, अली असगर, शाहबाज खान, अनिल जॉर्ज, अमन वर्मा आणि अशोक समर्थ यांसारखे अनुभवी कलाकार आहेत.