Tamannaah Bhatia Properties: तमन्ना भाटियाने 18 लाख रुपयांची व्यावसायिक मालमत्ता घेतली भाड्याने; 7.84 कोटींचे तीन फ्लॅट ठेवले गहाण

त्याबदल्यात जुहू, मुंबई येथे एक व्यावसायिक मालमत्ता 18 लाख रुपये प्रति महिना भाड्याने घेतली आहे.

File Photo

Tamannaah Bhatia Properties: अभिनेत्री तमन्ना भाटियाने अंधेरी पश्चिम, मुंबई येथे तीन निवासी सदनिका 7.84 कोटी रुपयांना गहाण ठेवल्या आहेत. त्याबदल्यात जुहू, मुंबई येथे एक व्यावसायिक मालमत्ता 18 लाख रुपये प्रति महिना भाड्याने घेतली आहे. ही माहिती रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म प्रॉपस्टॅकने नोंदणी दस्तऐवजांच्या माध्यमातून दिली आहे. नानावटी कन्स्ट्रक्शनने जुहू तारा रोडवरील वेस्टर्न विंडमध्ये 6065 चौरस फूट व्यावसायिक जागा 5 वर्षांसाठी 18 लाख रुपये प्रति महिना भाड्याने घेतल्याचे कागदोपत्री उघड झाले आहे.

तमन्ना भाटियाने भाड्याने घेतलेल्या मालमत्तेचे भाडे चौथ्या वर्षी 20.16 लाख रुपये आणि पाचव्या वर्षी 20.96 लाख रुपये होईल. कागदपत्रे पाहता त्यात इमारतीच्या तळमजल्यावरील आणि तळमजल्यावरील अपार्टमेंटचा समावेश असल्याचे समजते. 'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, नोंदणी 27 जून 2024 रोजी झाली होती. या करारासाठी 72 लाख रुपयांची डिपोझीट देण्यात आले होते.

गेल्या महिन्यात, बच्चन कुटुंबाने देखील प्रोपर्टी खरेदी केल्या. अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी 3 व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्या. अमिताभ यांनी अंधेरीतील पॉश एरिया वीरा देसाई रोड जवळील वीर सावरकर सिग्नेचर बिल्डींगमध्ये तीन ऑफिसं खरेदी केली आहेत. ही डील 20 जून 2024 रोजी झाली. त्याआधी मुलगा अभिषेक बच्चन याने बोरिवलीतील ओबेरॉय रियॅल्टीच्या ओबेरॉय स्काय सिटी या प्रकल्पात 15.42 कोटी रुपयांना सहा फ्लॅट खरेदी केले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या या इमारतीच्या 57 व्या मजल्यावर हे सहा अपार्टमेंट आहेत.