Taapsee Pannu To Marry Boyfriend Mathias Boe: तापसी पन्नू लवकरच विवाह बंधनात अडकणार? बॅडमिंटनपटूसोबत करणार लग्न

सध्या अनेक कलाकार विवाह बंधनात अडकत आहेत. तापसी पन्नू देखील लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. डंकी अभिनेत्री दीर्घकाळचा प्रियकर आणि बॅडमिंटनपटू, मॅथियास बो सोबत लग्न करणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Taapsee Pannu To Marry Boyfriend Mathias Boe

Taapsee Pannu To Marry Boyfriend Mathias Boe: मार्च महिन्याच्या अखेरीस आणखी एक अभिनेत्री विवाहबद्ध होणार आहे. सध्या अनेक कलाकार विवाह बंधनात अडकत आहेत. तापसी पन्नू  देखील लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. डंकी अभिनेत्री दीर्घकाळचा प्रियकर आणि बॅडमिंटनपटू, मॅथियास बो सोबत लग्न करणार आहे. शीख-ख्रिश्चन  या दोन्ही पद्धतीने लग्न सोहळा संपन्न होणार आहे. उदयपूर या मोहक शहरात विवाहसोहळा पार पडणार असुन फक्त घरातील मंडळी लग्नाला उपस्थित राहणार आहे. बॉलीवूडच्या कलाकारांना बोलावले जाणार नसल्याचे समोर आले आहे. हे किती सत्य आहे ते अद्याप स्पष्ट नाही. 

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात हे जोडपे विवाह बंधनात अडकणार आहे. तापसी आणि मॅथियास  10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी आत्तापर्यंत त्यांचे  रिलेशनशिप गुप्त ठेवले नव्हते. तापसीने अनेक ठिकाणी प्रियकरासोबत हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांचे नाते जगजाहीर होते. दरम्यान, आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तापसीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा  प्रशिक्षक आहे. मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. बॅडमिंटनपटू मॅथियासने  2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.