Big Boss OTT -2: एक दिवसाचा पाहूणा 'पुनित'; ह्या चुकीमुळे झाला बिगबॉसच्या घरातून 'आउट'

सोशल मीडियामुळे पुनितला चांगलीच ओळख मिळाली होती परंतू बिगबॉसच्या घरातून त्याला पहिल्याच दिवशी काढून टाकले. सतत चेतावनी देवूनही वागण्यात बदल झाला नाही त्यामुळे त्याचे नुकसान झाले.

Big Boss OTT -2: एक दिवसाचा पाहूणा 'पुनित'; ह्या चुकीमुळे झाला बिगबॉसच्या घरातून 'आउट'
puneet- file

Big Boss OTT -2:  बिंग बॉस ओटीटी सीजन 2 दोन दिवसांपुर्वी म्हणजे  17 जून पासून चालू  सुरू झाले आहे. बिग बॉसच्या माध्यमातून सलमान खानने ओटीटी प्लॅटफार्मवर पदापर्ण केले आहे. या आधी सलमान खान यांने बिगबॉस 16 चे होस्टिंग केलं. सर्व स्पर्धक बिंग बॉसच्या घरात आले.  सुप्रसिध्द अभिनेत्री पूजा भट्ट ह्या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून आली आहे. बिंग बॉस पाहणारा चाहता वर्ग खुप मोठा आहे. सलमान खानने सर्व स्पर्धांकांची ओळख करून दिली आहे. याचदरम्यान सोशल मीडिया स्टार पुनित याची ओळख  सर्वांना झाली.

पहिल्याच दिवसी पुनीतला त्यांच्या चुकीमुळे बिगबॉसच्या घरातून बाहेर जावे लागले आहे. हा क्षण इतिहासात पहिल्या्ंदच घडला असेल, स्पर्धक काही तासांमध्ये त्यांच्या वाईट वर्तणूकीमुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर झाला आहे. पुनितच्या वाईट वर्तणूकीमुळे बिगबॉस त्यांच्याबर पहिल्यात क्षणांपासून डोळे ठेवून होता. बिगबॉसने पुनितला चेतावणी दिली होती परंतू त्यांच्या वागण्यात काही बदल दिसून आले नाही त्यामुळे बिग बॉसने त्याला घरातून बाहेर काढले.

पुनितने सपुर्ण टुस्थपेस्ट चेहऱ्यावर लावली. त्यानंतर बिगबॉसच्या घरात सतत अपशब्द वापरला. त्यांचे हे वागणे कोणालात आवडले नाही. घरात तोडफोड सुद्दा केली. सतत बिगबॉस पुनितला चेतावनी देत होता परंतु त्यांच्या वागण्यात काहीच बदल झाले नाही.

शेवटी बिगबॉसने त्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आणि एका दिवसातच त्याला बिग बॉसच्या घराला  टाटा बाय बाय करावे लागले. त्याच्या चुकीमुळेच त्याचे मोठे नुकसान झाले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 10:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).