सुहाना खान हिचे अभिनयात पदार्पण, पाहा पहिल्या चित्रपटाचे पोस्टर

बॉलिवूड किंग खान शाहरुख याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरु आहेत.

Suhana Khan (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड किंग खान शाहरुख याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरु आहेत. सुहाना हिचे पार्टीमधील फोटो किंवा अभिनय करतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. तसेच शाहरुख याने एका मुलाखतीत त्याने सुहाना लवकरत चित्रपटातून झळकणार असल्याचे सांगितले होते.

मात्र सुहाना हिचा येणारा चित्रपट कसा असणार याबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान सुहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियात पाहायला मिळाला असून त्यामध्ये ती एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण करणार असल्याचे दिसून येत आहे. याबद्दलचा फोटोला The Grey Part Of Blue असे नाव देण्यात आले आहे.(जगप्रसिद्ध वोग मॅगझीनसाठी गौरी खान ने पहिल्यांदाच शेअर केले मन्नत चे आतील फोटो, पाहा गौरी खानचे मन्नत मधील हॉट फोटोशूट)

रिपोर्ट्सनुसार सुहाना हिच्या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन Theodore Gimeno करत आहे. सुहाना या शॉर्टफिल्मच्या पोस्टरमध्ये कॅज्युएल लूकमध्ये दिसून येत आहे. यापूर्वी याच्या ऑफ शूटचे फोटोसुद्धा पाहायला मिळाले होते. सुहाना ही अभिनयातून पदापर्ण करण्यापूर्वी तिने दिग्दर्शनसुद्धा केले आहे.