Shreyas Talpade : "आरोग्याची एवढी काळजी घेऊन ही...", हृदयविकाराचा झटका आणि कोरोना लसीबद्दल श्रेयस तळपदेकडून अनेक शंका उपस्थित

lehren retro ला दिलेल्या मुलाखतीत त्याने कोरोना लशीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.

Shreyas Talpade

Shreyas Talpade: मराठीसह बॉलीवूड(Bollywood)मध्ये आपल्या कलेची उत्तम छाप सोडणारा अभिनेता श्रेयस तळपदेने नुकतच त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटका (Heart Attack)ला कोरोना लस (Covid Vaccine) जबाबदर असल्याचे मत मांडले आहे. lehren retro ला दिलेल्या मुलाखतीत त्याने कोरोना लशीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. कोरोना लस घेण्याआधीचे त्याचे आरोग्य आणि आत्ताचे आरोग्य यांबाबत बोलताना त्याच्या आरोग्यात झालेल्या बदलांवर भाष्य केले. चांगल्या आरोग्यासाठी सर्व नियम पाळूनही हार्ट अटॅक येणे ही गंभीरबाब आहे. त्यावरही त्याने मुलाखतीत सवाल उपस्थित केले आहेत.

“मी धुम्रपान करत नाही, तंबाखू खात नाही. महिन्यातून एकदा किंवा लिमिटमध्ये ड्रिंक करतो. हृदयविकाराचा झटका आला तेव्हा माझं कोलेस्ट्रॉल निश्चितच थोडं जास्त होतं. मला डायबिटीज, ब्लज प्रेशर असा कोणताही त्रास नाहीये. पण, त्यामुळे मला अचानक हार्ट अटॅक कसा येऊ शकतो. आता माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. औषधं आणि योग्य उपचारांमुळे आता कोलेस्ट्रॉल लेव्हलवर आलंय.” असा सवाल श्रेयसने दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे.

१५ डिसेंबर २०२३ रोजी द जंगल बूक चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर अभिनेत्यावर वेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. लसीकरणामुळे हृदयविकाराचा झटका आला का? असा प्रश्न विचारताच श्रेयसने प्रतिक्रीया देत, “आरोग्याची एवढी काळजी घेऊन अटॅक आला, मी या थिअरीला नक्कीच नाकारू शकत नाही. करोनाची लस घेतल्यानंतर मला तुलनेने जास्त थकवा जाणवू लागला होता. कदाचित लसीकरण किंवा कोव्हिडमुळे सुद्धा मला हार्ट अटॅक आला असेल आपण नाकारू शकत नाही. आता कोव्हिड-१९ आजारामुळे की लसीकरणामुळे हे नेमकं कशामुळे झालं मला कल्पना नाही. पण, नक्कीच हार्ट अटॅकचा या दोन्हीपैकी एका गोष्टीशी संबंध आहे.

श्रेयस पुढे म्हणाला, “आपण सगळ्यांनीच संबंधित कंपनीवर विश्वास ठेवला. आपण आपल्या शरीरासाठी कोणती लस घेतली, त्यात काय होतं हे आपल्याला माहिती नाही ही गोष्ट खूपच दुर्दैवी आणि गंभीर आहे. व्हॅक्सिनमुळे आपल्या शरीरात नेमका काय बदल झाला हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. अटॅकचं कारण कोव्हिड आहे की लस हे मी ठामपणे सांगू शकत नाही कारण माझ्याकडे ठोस पुरावे नाहीत.”



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif