Stree 2 Box Office Collection Day 14: श्रद्धा कपूर-राजकुमार राव स्टारर 'स्ट्री 2' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 414 कोटींची कमाई
मात्र, काल चित्रपटाने सर्वात कमी कमाईचा आकडा नोंदवला.
Stree 2 Box Office Collection Day 14: वर्ष 2024 मधला ब्लॉकबस्टर मूव्ही स्ट्री 2 बॉक्स ऑफिसवर( Stree 2 Box Office Collection) सध्या धुमाकूळ घालत आहे. चित्रपटपटाने 14 दिवसांत 414 कोटींची कमाई केली. मात्र दुसऱ्या बुधवारी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय घट दिसून आली आहे. 14 व्या दिवशी चित्रपटाने 23 लाखांची कमाई केली, अशी माहिती सॅकनिल्कने दिली. अमर कौशिक दिग्दर्शित हॉरर-कॉमेडी चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 414.78 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'स्त्री 2' 15 ऑगस्ट रोजी रिलीज झाला चित्रपटात राजकुमार राव(Rajkummar Rao) आणि श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत. (हेही वाचा: Stree 2 Box Office Collection: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 360 कोटींहून अधिकची कमाई)
चित्रपटपटाची 14 दिवसांत 414 कोटींची कमाई
स्ट्री 2 चित्रपटात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी आणि विजय राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वरुण धवन एक छोटीशी भूमिका साकारत आहे. दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपट समिक्षक मंगळवारी, तरण आदर्श यांनी X वर एक पोस्ट केली जन्माष्टमीच्या सुट्टीच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर स्त्री 2 वर्चस्व शेअर केले. त्यांनी लिहिले, "#Stree2 थांबवता येत नाही, चित्रपट 500 कोटीच्या कमाईकडे वाटचाल करताना दिसत आहे." असे त्यांनी म्हटले.
चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 414 कोटींची कमाई