Salman khan Death Threat: सलमान खानला पुन्हा धमकी, मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला पाठवला संदेश

यावेळी गुरुवारी मध्यरात्री मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षात सलमान खानसाठी धमकीचा संदेश आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धमकीच्या मेसेजमध्ये 'सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई'वर एक गाणे लिहिण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीला महिनाभरात मारले जाईल, असे धमकीच्या संदेशात म्हटले आहे.

Salman Khan (फोटो सौजन्य - फेसबुक)

Salman khan Death Threat: बॉलिवूड स्टार सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाली आहे. यावेळी गुरुवारी मध्यरात्री मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षात सलमान खानसाठी धमकीचा संदेश आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धमकीच्या मेसेजमध्ये 'सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई'वर एक गाणे लिहिण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीला महिनाभरात मारले जाईल, असे धमकीच्या संदेशात म्हटले आहे. त्याची अवस्था अशी होईल की, त्याला स्वतःच्या नावाने गाणी लिहिता येणार नाहीत. सलमान खानमध्ये हिम्मत असेल तर त्याला वाचवून दाखवा. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 दिवसांत सलमान खानला पाचव्यांदा धमकी मिळाली आहे. याआधीही त्याला तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमक्या आल्या होत्या. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही सलमान खानला मुंबई वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

धमकीमध्ये सलमान खानने बिश्नोई समाज मंदिरात जाऊन हरण शिकार प्रकरणी माफी मागावी आणि ५ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. असे न केल्यास आम्ही त्यांना ठार मारू. आमची टोळी अजूनही सक्रिय आहे.

गेल्या गुरुवारी बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानलाही एका कॉलवर जीवे मारण्याची धमकी आली होती. वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वांद्रे पोलिसांनी कॉल ट्रेस केला असता तो छत्तीसगडच्या रायपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लोकेशनच्या आधारे छापा टाकला असता फैजान खान हा सापडला.

मुंबई पोलिसांनी रायपूर गाठून फैजान खानची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर फैजानने आयएएनएसच्या संभाषणात सांगितले होते की, माझा फोन २ नोव्हेंबर रोजी हरवला होता, ज्याबद्दल मी खामदीह पोलीस स्टेशन (रायपूर) येथे तक्रार दिली होती. स्थानिक पोलिसांसह मुंबईतील दोन पोलिस माझ्या घरी आले होते.

 शाहरुख खान धमकी प्रकरणी त्यांनी सुमारे दोन तास माझी चौकशी केली. मुंबई पोलिसांनी मला नोटीस देऊन 14 तारखेला चौकशीसाठी मुंबईला बोलावले आहे. मी मुंबईला जाईन. मी त्यांना पूर्ण सहकार्य केले आहे.