150 Years Of Celebrating The Mahatma: सलमान खान, शाहरुख खान, कंगना रनौत सह बॉलिवूडकरांनी सांगितले महात्मा गांधी यांचे विचार; नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रंगला सोहळा (Watch Video)
या कार्यक्रमासाठी सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan), कंगना रनौत (Kangana Ranout), आमिर खान (Aamir Khan), व अन्य अनेक बॉलिवूड कलाकार मंडळी सुद्धा उत्साहात सहभागी झाली होती
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती (Mahatma Gandhi 150th Birth Anniversary) निमित्त यंदा वर्षभरात अनेक उपक्रम राबिवण्यात येणार आहेत. आज सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत दिल्ली (Delhi) मध्ये एक असाच खास सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan), कंगना रनौत (Kangana Ranout), आमिर खान (Aamir Khan), जॅकलिन फर्नांडिस, बोनी कपूर,एकता कपूर, राजकुमार हिरानी व अन्य अनेक बॉलिवूड कलाकार मंडळी सुद्धा उत्साहात सहभागी झाली होती.या खास कार्यक्रमातून या कळकरांनी महात्मा गांधींचे विचार मांडत एक खास व्हिडीओ देखील शूट केला. हा व्हिडीओ PMO ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे काही खास फोटो शेअर करून कलाकार मंडळींचे कौतुक केले आहे. बॉलिवूड कलाकार आणि त्यांची एनर्जी ही नक्कीच कौतुकास्पद आहे, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील देशाला वाखाणले जाते. या इंडस्ट्रीमधील सिनेमा, गाण्यांनी लोकांना जोडले जाते, म्ह्णूनच त्यांच्या मदतीने गांधींचे विचार पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा आशयाचे ट्विट मोदी यांनी केले आहे.
नरेंद्र मोदी पोस्ट
या कार्यक्रमात विकी कौशल, रणबीर कपूर सहित अन्य कलाकार मंडळींचा महात्मा गांधींचे विचार मांडणारा व्हिडीओ सुद्धा अवघ्या काहीच वेळात सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.
पहा व्हिडीओ
आजच्या या खास कार्यक्रमात आमिर खान याने सुद्धा मोदी सरकारच्या या पुढाकाराने कौतुक केले, क्रिएटिव्ह मार्गातून महत्तम गांधींचे विचार पोहचवणे हा स्तुत्य उपक्रम आहे, आणि त्यात आम्ही शक्य तेवढा सहभाग घेऊ असेही आमिर म्हणाला. तर सलमानने सुद्धा महत्तम गांधी यांचे विचार हे देशासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हणत या कार्यक्रमातून हे विचार पूढे नेण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले आहे.