Bigg Boss Marathi 5: अभिजीतला 'बांगड्या घाल' म्हणणं जान्हवीला पडणार भारी; रितेश देशमुखे दिली घरा बाहेर काढण्याची धमकी

तिच्या त्या वक्तव्यावर ‘भाऊचा धक्का’ मध्ये होस्ट रितेश देशमुखने तिला खडे बोल सुनावले. इतकंच नाही तर जान्हवीला घरातून बाहेर काढण्याची धमकी ही दिली.

Photo Credit- Instagram

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे(Bigg Boss Marathi 5) पर्व सुरू आहे. शो सुरू होऊन दोन आठवडे झाले नाहीत तोच स्पर्धक एकमेकांवर तुटून पडायला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या आठवड्यात जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar)घरात धुमाकूळ घालत असल्याचं दिसत आहे. घरातील इतर सदस्यांशी भांडणं करून त्यांचा अपमान करत जान्हवी किल्लेकर हिने अभिजीत सावंतवर(Abhijit Sawant) निशाणा साधला. ‘बिग बॉस मराठी’चा हा नवीन प्रोमो चांगलाच चर्चेत आहे.(हेही वाचा: Bigg Boss Marathi 5: आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घेणार सगळ्यांचा क्लास; पाहा कोणाचा हिशोब होणार)

आज या सीझनमधील दुसरा 'भाऊचा धक्का' आहे. या एपिसोडमध्ये रितेश देशमुख स्पर्धकांचा क्लास घेणार आहे. आजच्या भागाचे काही प्रोमो बाहेर आले आहेत. त्यात रितेश जान्हवीवर तिच्या त्या तक्तव्यामुळे प्रचंड संतापलेला दिसत आहे. तसेच काही स्पर्धकाला तो कानमंत्र देणार आहे. तो पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे, या आठवड्यात जान्हवीने वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, आर्या जाधव यांच्याशी कडाक्याची भांडणं केली.

व्हिडीओमध्ये रितेश रागात जान्हवीला सुनावताना दिसतो. 'जान्हवी अभिजीतला तुम्ही म्हणालात बांगड्या घाल. बांगड्या घाल म्हणजे काय? बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असतं. याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही, तर देश सांभाळतात. मी बाकीच्यांना बाहेर काढेन की नाही माहीत नाही. पण तुम्हाला नक्की काढेन,' असं म्हणत रितेशने जान्हवी किल्लेकरचा समाचार घेतला. त्यावर जान्हवी रडताना दिसतेय.

पोस्ट पहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आठवडाभर जान्हवी घरातील सदस्यांना नको नको ते बोलत होती, नावाजलेली कलाकार वर्षा उसगांवकर यांना अपमानास्पद बोलली आहे. त्यामुळे शो पाहणारे प्रेक्षकही तिच्यावर संतापले आहेत.'ही फालतूची ओव्हरअ‍ॅक्टिंग नका करू. त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाही. पण, तुम्हाला दिलाय,” असं ती या भांडणात म्हणाली. दुसरीकडे रितेशने संताप व्यक्त करत तिला घरातून बाहेर काढणार असल्याचं वक्तव्य केलं. त्याच काय होईल हे पहावं लागेलं



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif