राजकारण डायलॉग: धीरज देशमुख यांच्या प्रचारसभेत रितेश देशमुख चे 'सूरज चव्हाण' च्या अंदाजात राजकीय डायलॉग (Watch Video)

बिग बॉस मराठी 5 विजेता सूरज चव्हाणच्या 'झापूक झुपूक' अंदाजामध्ये राजकीय डायलॉग म्हणत रितेश देशमुखांनी केलं मतदारांना धीरज देशमुख, अमित देशमुख यांना मत देण्याचं आवाहन केलं आहे.

Riteish Deshmukh । @ Dhiraj Deshmukh

लातूर ग्रामीण विधान `मध्ये भाऊ धीरज देशमुखच्या (Dhiraj Deshmukh) प्रचार सभेत अभिनेता रितेश (Riteish Deshmukh) यांनी केलेल्या भाषणाची विशेष चर्चा आहे. त्यामध्येही राजकारणाच्या मंचावर केलेली डायलॉग बाजी तुफान गाजली आहे. रितेश देशमुखचे हे राजकारण डायलॉग सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख निवडणूकीच्या रिंगणात आहेत. अमित लातूर सिटी तर धीरज लातूर ग्रामीण मधून निवडणूकीला सामोरे जात आहेत. धीरज यांच्या प्रचारात काल (10 नोव्हेंबर) रितेश देशमुखांनी बिग बॉस 5 विजेता सूरज चव्हाण याच्या लोकप्रिय डायलॉगच्या मदतीने मतदारांना धीरज साठी मत देण्याचं आवाहन केले आहे. तर या भाषणातच त्यांनी 'धर्म धोके में है म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात' असल्याचं म्हटलं आहे.

रितेश  देशमुखची राजकीय डायलॉग बाजी 

यंदा विधानसभेचं वातावरण 'झापूक झुपूक आहे'. समोर गुलिगत धोका आहे त्यामुळे सावधान रहा आणि बुक्कीत टेंगुळ नव्हे तर बटणाने टेंगूळ देण्याची बारी आली आहे असा उल्लेख रितेशने केला आहे. दरम्यान सूरज चव्हाण हा बिग बॉस 5 मराठीचा विजेता आहे. आणि त्याच्या या खास शैलीतील डायलॉगची रितेशने ऑन स्क्रीन आणि आता ऑफ स्क्रीन  थेट राजकारणाच्या मंचावर मदत घेतल्याचं पहायला मिळालं आहे.

लातूरच्या भाषणामध्ये श्रीकृष्णांच्या वचनांचा उल्लेख करत 'धर्म संकटात आहे' अशी ओरड करणार्‍या विरोधकांचाही रितेश यांनी समाचार घेतला आहे.  'कर्म हाच धर्म आहे.' असं श्रीकृष्ण म्हणतात. कर्म करत राहणे म्हणजे धर्म करत राहणे. जे काम करत नाही त्यांना धर्माची गरज आहे. जे धर्म धोक्यात आहे, धर्माला वाचवा अशी ओरड करत आहेत. ते खरं तर धर्माला प्रार्थना करत आहेत की पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा.'

सोशल मीडीया इंफ्लुएंसर सूरज चव्हाण याच्या डायलॉगबाजीचे अनेक चाहते आहेत. टिकटॉक पासून सुरू त्याचा प्रवास आता त्याला बिग बॉस या रिएलिटी शोच्या विजेते पदामुळे यशाच्या शिखरावर घेऊन गेले आहे. सध्या राज्यात त्याच्या डायलॉगची सर्वत्र चर्चा आहे अशात आता राजकीय मंचावर देखील  त्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी बारामती मध्येही सूरजने अजित पवारांना 'झापूक झुपूक' मतदान करण्याचं जाहीर आवाहन केले आहे. Suraj Chavan Supports Ajit Pawar: 'अजित दादांना झापूक झुपूक मतदान करा'; Bigg Boss Marathi 5 विजेता सूरज चव्हाण चं बारामती मध्ये जाहीर सभेत आवाहन (Watch Video) .

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी  मतदान आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif