राखी सावंत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; ठरली 'Best Item Dancer in Bollywood'

राखी सावंतला एका मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा कोणता साधा सुधा पुरस्कार नाहीत तर, आहे ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट आयटम डान्सर’ पुरस्कार.

Rakhi Sawant gets Dadasaheb Phalke Award (Photo Credits: Instagram)

बॉलीवूडमध्ये जितकी चर्चा एका आघाडीच्या नायिकेची होत असते, आजकाल तितकीच चर्चा राखी सावंतची (Rakhi Sawant) होत आहे. नुकताच पाकिस्तानी झेंड्यासोबत राखीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता राखी फारच वेगळ्या आणि हटके गोष्टीमुळे चर्चेत आहे. राखी सावंतला एका मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा कोणता साधा सुधा पुरस्कार नाही तर, आहे ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट आयटम डान्सर’ पुरस्कार. (Dadasaheb Phalke Award) होय, विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे. शनिवारी राखीला हा पुरस्कार मिळाला. दादासाहेब फाळके फाउंडेशनकडून हा पुरस्कार देण्यात येतो.

आपण आपले करियर वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी अनेक प्रयत्न करतो, मात्र त्याचे चीज होण्यासाठी पाठीवर कौतुकाची थाप हवी असते. हीच गोष्ट या फाउंडेशनने केली आहे. राखीने गेल्या 12 वर्षांत विविध भाषांत मिळून जवळजवळ 100 आयटम गाण्यांवर डान्स केला आहे, मात्र आजपर्यंत तिला कोणताही पुरस्कार मिळाला नाही. म्हणूनच यावर्षी राखीला सर्वोत्कृष्ट आयटम डान्सर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (हेही वाचा: बॉक्स क्रिकेट मैदानावर बोल्ड राखी सावंत; Sexy Photos पाहून चाहते क्लिन बोल्ड)

मात्र अजूनही जनतेला, तिच्या चाहत्यांना यावर विश्वास बसत नाही. काहींनी तर तिने हा पुरस्कार विकत तर घेतला नाही ना? अशी विचारणाही केली. मात्र यावर, ‘इतका मोठा पुरस्कार विकत घेण्याची माझी कुठली औकात,’ असे राखीने उत्तर दिले. नुकत्याच आपल्या भोजपुरी आयटम नंबर नंतर, राखी मनमोहिनी या मालिकेत दिसून आली होती. त्यानंतर आता ती बॉक्स क्रिकेट लीग - सीझन 4  (Box Cricket League - Season 4) चे निवेदन करणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now