Raja Harishchandra Movie 108th Anniversary: आजच्या दिवशी प्रदर्शित झाला होता पहिला भारतीय चित्रपट 'राजा हरिश्चंद्र', जाणून घ्या याच्या निर्मितीविषयी रोमांचक गोष्टी

1 एप्रिल 1912 मध्ये 'फाळके फिल्म्स' नावाची प्रोडक्शन कंपनी त्यांनी सुरु केली.

Raja Harishchandra Movie 108th Anniversary (Photo Credits: Instagram)

भारताला सिनेसृष्टीच्या जगात घेऊन जाणारा पहिला भारतीय चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' (Raja Harishchandra) ला आज 108 वर्षे पुर्ण झाली. या ब्लॅक अँड व्हाईट चलचित्रपटापासून ते आजचा VFX पर्यंतचा भारतीय सिनेसृष्टीचा प्रवास वाखाखण्यासारखा आहे. या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. म्हणूनच या चित्रपटाचा निर्मितीचा प्रवास देखील तितकाच खडतर होता. मात्र या चित्रपटाचे निर्माते तसेच भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) ही गोष्ट सत्यात उतरवली. जाणून घेऊया राजा हरिश्चंद्र चित्रपटाविषयी रोमांचक गोष्टी

श्रीराम-कृष्णाला पडद्यावर चालताना बघायचे होते स्वप्न

दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 मध्ये झाला. त्यांनी कधीही चित्रपच पाहिला नव्हता. एकदा ते एका मित्राच्या आग्रहास्तव गिरगावच्या अमेरिका इंडिया थिएटरमध्ये प्रदर्शित इंग्रजी चित्रपट 'अमेजिंग अॅनिमल' पाहायला आले. पडद्यावर पहिल्यांदा त्यांनी लोकांना चालताना पाहिले. हे पाहून ते आश्चर्यचकित झाले. घरी आल्यावर जेव्हा त्यांनी ही गोष्ट लोकांना सांगितली तेव्हा कोणीही त्यावर विश्वास ठेवला नाही. त्यावेळी ते 41 वर्षांचे होते. त्याच्या दुस-याच दिवशी ते संपूर्ण कुटूंबाला चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेले. तेव्हा सर्वांची खात्री पटली. त्यानंतर दादासाहेब फाळके नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी जाऊ लागले. त्यानंतर जेव्हा त्यांनी द लाइफ ऑफ क्राइस्ट’ मध्ये येशू ख्रिस्ताला पडद्यावर चालताना बघितले तेव्हा त्यांच्या मनात विचार आला आपले देव श्रीराम आणि कृष्णही असे चालता-फिरताना दिसले असते. तेव्हाच त्यांनी आपण ही गोष्ट सत्यात उतरवायचे ठरवले.

चित्रपट निर्मितीसाठी लंडनला जाऊन पोहोचले

चित्रपट बनविण्याच्या हट्टाला पेटलेले दादासाहेब लंडनमध्ये जाऊन फिल्म मेकिंग शिकले.

दोन आठवड्यानंतर ते मुंबईत परत आले. 1 एप्रिल 1912 मध्ये 'फाळके फिल्म्स' नावाची प्रोडक्शन कंपनी त्यांनी सुरु केली.

सोपा नव्हता चित्रपट निर्मितीचा प्रवास

चित्रपट बनवणे हा स्वप्न पाहणे जितके सोपे होते त्याहून जास्त त्यासाठी निर्माता शोधणे कठीण होते. तेव्हा दादासाहेबांवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. म्हणून दादासाहेबांनी मटारचे झाडं विकसित करण्यावर एक छोटा चित्रपट बनविला. त्यानंतर यशवंत नाडकर्णी एवं नारायण राव यांना विश्वास निर्माण झाला आणि ते दादासाहेबांना पैसे देण्यास तयार झाले.

चित्रपटासाठी कलाकार शोधणे

चित्रपटासाठी कलाकार शोधण्यासाठी त्यांनी पेपरात जाहिरात दिली. मात्र त्यांना कुणाचाही अभिनय विशेष पसंत आला नाही. त्यानंतर त्यांनी नाटकातील काही कलाकार निवडले. ज्यात पांडुरंग गढाधर सने, गजानन वासुदेव आणि दतात्रेय दामोदर दबके यांचा समावेश होता.

...आणि असा बनला इतिहास

चित्रपटासाठी लागणारी सर्व सामग्री आणि कलाकार निवडल्यानंतर दादरच्या मुख्य रोडवर असलेल्या स्टुडिओमध्ये 21 दिवस या चित्रपटाचे शूटिंग चालले. त्यानंतर 21 दिवसांनी हा मूक चित्रपट तयार झाला. 21 एप्रिल 1913 मध्ये ग्रांट रोडला या चित्रपटाचे प्रमियर झाले. आणि 3 मे 1913 ला गिरगावच्या बॉम्बे कॉर्ननेशन थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिला भारतीय चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. हे पाहून दादासाहेब फाळके यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्यातील जिद्दीने एक किर्तीमान इतिहास रचला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif