प्रियांका चोप्रा ने शेअर केला Smoking करतानाचा कूल फोटो, आता अस्थमा कुठे गेला? म्हणत नेटकऱ्यांनी घेतली शाळा
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही अलीकडे Vaction मोड मध्ये असल्याने सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. या फोटोची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा सुद्धा असते, यावरून प्रियांकाची चाहते मंडळी अनेकदा तिच्यावर अगदी स्तुतिसुमनं उधळतात तर वेळप्रसंगी ट्रोल करून शाळा सुद्धा घेतात.आता सुद्धा प्रियांका आपल्या पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन साठी मालदीव (Maldives) मध्ये असल्याचे समजत आहे. या फॅमिली ट्रीपचे अनेक फोटो सुद्धा तिने शेअर केले आहेत, मात्र प्रियंकाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.
प्रियांका या फोटो मध्ये आपला पती निक जोनस (Nick Jonas) आणि आई मधू चोप्रा (Madhu Chopra) यांच्यासोबत हातात सिगरेट धरून स्मोक करताना पाह्यला मिळते, यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच फैलावर घेतलं आहे. दिवाळीच्या काळात आपल्याला अस्थमा आहे त्यामुळे धुराचा त्रास होतो असे म्हणत जाहिराती करणारी प्रियांका आता अचानक सिगरेट पिताना दिसल्याने तिच्या दुट्टपी वागण्यावर प्रश्न केला जात आहे. RSS ची खाकी पॅन्ट घालून आलीस का? प्रियांका चोप्रा हिची पुन्हा एकदा सोशल मीडियात ड्रेसवरुन खिल्ली
पहा प्रियांकाचा असाही अंदाज..
खरतर, प्रियंकाने मागील वर्षीच्या दिवाळीत एक जाहिरात केली होती, ज्यामध्ये तिने फटाके फोडणाऱ्यांना संबोधून बोलताना, फटाक्यांनी वायुप्रदूषण होते तसेच यामुळे माझ्यासारख्या अस्थमाच्या रुग्णांना त्रास होतो, असे म्हंटले होते. मात्र त्यांनंतर प्रियंकाने स्वतःच्या लग्नात लाखो रुपयांचे फटाके फोडून आपल्याच वागण्याला मोडीत काढले होते. यावरूनही अनेकांनी प्रियंकाला टार्गेट केले होते. पण त्यावरून काहीही धडा न घेता तिने पुह्ना एकदा आपले विरोधाभासी वागणे दाखवून ट्रोलर्सना आयते आमंत्रण दिले आहे
पहा काय म्हणतायत नेटकरी
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी प्रियंकाने परिवार व मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा केला होता. यावेळी लाल रंगाच्या ट्रेंडी ड्रेसमध्ये कुंकू लावलेली प्रियांका आपल्या देसी गर्ल ओळखीला पुरेपूर न्याय देताना दिसून आली होती.