Sara Tendulkar चे साडीतील फोटो व्हायरल, चाहत्यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आयपीएल 2022 मध्ये कायमच चर्चेत राहिली. या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली, पण सारा बहुतेक सामन्यांमध्ये मुंबईला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती.
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आयपीएल 2022 मध्ये कायमच चर्चेत राहिली. या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली, पण सारा बहुतेक सामन्यांमध्ये मुंबईला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. आयपीएलमधलं मुंबईचं आव्हान संपल्यानंतर साराचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सारा पारंपारिक मराठी वेषात दिसली. साडी, पारंपारिक टिकली आणि दागिने घातलेली सारा लग्नाला गेली होती. सारा तेंडुलकरच्या हातामध्ये कलशही दिसत आहे. या लग्नासाठी सारा पूर्णपणे मराठी वेषात सजली होती. नाकातल्या नथीपासून ते टिकली, गजरा आणि साडीपर्यंत सगळंच महाराष्ट्रीय पद्धतीचं होतं. साराचे पहिल्यांदाच साडीमधले फोटो समोर आले आहेत. हेही वाचा Urfi Javed Bikini Video: हिरव्या रंगाची बिकिनी घालून बागेत फिरताना दिसली उर्फी जावेद; पहा तिचा बोल्ड अंदाज (Watch)
लग्नाच्या इतर कार्यक्रमांमध्ये साराने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता. यावेळी तिने नातेवाईकांचीही भेट घेतली. सारा शिक्षणासाठी लंडनमध्ये असते, पण काही दिवसांसाठी ती भारतामध्ये आली आहे.लग्नामध्ये सचिन तेंडुलकर नवविवाहित जोडप्यासह दिसला. मुंबईच्या जे डब्ल्यू हॉटेलमध्ये हे लग्न झालं. लग्नाचे हे फोटो समीर वसईकर यांनी त्यांच्या फेसबूकवर शेयर केले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 24, 2022 12:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

