Nitin Chauhaan Suicide : Splitsvilla 5 चा विनर टीव्ही अभिनेता नितीन चौहानने केली आत्महत्या!' दादागिरी 2' शो मधून मिळाली होती प्रसिद्धी

ते फक्त 35 वर्षांचे होते. यूपीच्या अलीगढ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नितीनने एमटीव्हीचा 'स्प्लिट्सविला सीझन 5' देखील जिंकला होता. क्राईम पेट्रोलमुळेही तो चांगलाच प्रसिद्ध झाला. नितीन शेवटचा 2022 मध्ये सब टीव्हीच्या 'तेरा यार हूं मैं' शोमध्ये दिसला होता.

Nitin Chauhaan Suicide

Nitin Chauhaan Suicide : रिॲलिटी शो 'दादागिरी 2' जिंकून प्रसिद्ध झालेले टीव्ही अभिनेता नितीन चौहान यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते फक्त 35 वर्षांचे होते. यूपीच्या अलीगढ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नितीनने एमटीव्हीचा 'स्प्लिट्सविला सीझन 5' देखील जिंकला होता. क्राईम पेट्रोलमुळेही तो चांगलाच प्रसिद्ध झाला. नितीन शेवटचा 2022 मध्ये सब टीव्हीच्या 'तेरा यार हूं मैं' शोमध्ये दिसला होता.याशिवाय तो जिंदगी डॉट कॉम, क्राईम पेट्रोल आणि फ्रेंड्स यांसारख्या मालिकांमध्येही दिसला होता.  शोमधील त्यांचे सहकलाकार सुदीप साहिर आणि सायंतानी घोष यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली, परंतु त्यांना अधिक माहिती नसल्याचे सांगितले. त्याच्या माजी सहकलाकारांपैकी एक विभूती ठाकूरच्या पोस्टनुसार, नितीनने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

येथे पाहा पोस्ट

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by 𝐍𝐈𝐓𝐈𝐍 𝐂𝐇𝐀𝐔𝐇𝐀𝐍 (@nitinchauhanofficial)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांचे वडील मुंबईत पोहोचले असून ते त्यांचे पार्थिव अलिगढला घेऊन जाणार आहेत. याबाबत पोलिसांकडून सध्या कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.