Priyanka Nick Reception Party : अशी रंगली प्रियंका आणि निकच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी; नरेंद्र मोदींची उपस्थिती ठरली लक्षणीय
यासाठी नरेंद्र मादींनीदेखील उपस्थिती लावली.
पाहता पाहता देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) बोहल्यावर चढली काय, इंग्लिशमध्ये व्हाऊज (vows) घेतल्या काय आणि आता राजधानी दिल्लीत मोठ्या थाटामाटात तिच्या लग्नाचे रिसेप्शनदेखील पार पडलेदेखील. बॉलीवूडच्या तीन दिग्गज तारकांच्या लग्नाने हे 2018 वर्ष गाजले, त्या म्हणजे सोनम कपूर, दीपिका पदुकोन आणि प्रियंका चोप्रा. ‘क्वांटिको’ (Quantico) या टीव्ही सिरीजमुळे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी बनलेली प्रियंका चोप्रा गेली 4 वर्षे भारताबाहेर काम करत आहे. तिचे व्यक्तिमत्व, तिचा लूक, तिचा मेकअप, विविध कार्यक्रमांमधील तिचे कपडे या सर्वांचीच दाखल परदेशी माध्यमे घेताना दिसून येतात. याचसोबत निक जोनस (Nick Jonas) ही एक लोकप्रिय गायक आणि अभिनेता असल्याने प्रियंका आणि निकच्या लग्नाच्या प्रत्येक गोष्टीची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये होती. अशातच आता त्यांच्या रिसेप्शनचे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होत आहेत. प्रियंका चोप्राच्या या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावलेल्या पाहुण्यांमध्ये आकर्षण ठरले ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
शनिवारी, 1 डिसेंबर रोजी हे दोघे ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. तर रविवारी 2 डिसेंबर रोजी पारंपरिक हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. दरम्यान मंगळवारी दिल्लीतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये प्रियंका आणि निकचे रिसेप्शन पार पडले. रिसेप्शनसाठी कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळींसहित अनेक सेलिब्रेटी आणि महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश होता. नरेंद्र मोदी सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजस्थानमध्ये प्रचार मोहिमेत व्यस्त होते. तेथील प्रचारसभा संपल्यानंतर ते दिल्लीला या रिसेप्शनसाठी रवाना झाले होते.
View this post on Instagram
EPIC #priyankachopra #nickjonas with PM Modi #nickyankawedding #manavmanglani @manav.manglani
A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on
नरेंद्र मोदींनी भेट म्हणून दोघांनाही गुलाबाचे फुल देऊन, प्रियंका आणि निकला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या रिसेप्शनलाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती
View this post on Instagram
How beautiful! Priyanka Chopra in @sabyasachiofficial #priyankachopra #nickjonas
A post shared by Faiza Pervaiz (@fyza_atelier) on
हिंदू पद्धतीच्या लग्नासाठी प्रियंकाने सब्यसाची (Sabyasachi)निर्मित संपूर्ण लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. हा लेहंगा तयार करण्यासाठी तब्बल 3720 तास लागले होते. तर ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नासाठी आंतरराष्ट्रीय डिझायनर राल्फ लॉरेन (Ralph Lauren)ने प्रियंकाचा गाउन तयार केला होता. राल्फ लॉरेनने आतापर्यंत फक्त तीनच लग्नाचे गाउन तयार केले आहेत त्यातील एक प्रियंकाचा आहे.
दिल्लीच्या रिसेप्शननंतर प्रियंका आणि निक मुंबईमध्येही एक रिसेप्शन आयोजित करणार असल्याची माहिती मिळत आहे, मात्र त्याबद्दल अजूनतरी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.