Nach Baliye 9 फेम Abigail Pande हिने टॉपलेस होऊन केला योगा, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा (See Photos)

योगा व फिटनेस फ्रीक एबिगेल हिने काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून योग करत असतानाच एक फोटो पोस्ट केला होता, या फोटोमध्ये तिने पूर्णतः टॉपलेस होऊन पोझ दिली होती.

Abigail Pande (Photo Credits: Instagram)

सोशल मीडियावर सेलिब्रिटींना कधी कपड्यांवरून तर कधी आपल्या मतामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याच्या अनेक प्रसंगाशी आपण परिचित आहोत पण यावेळेस हिंदी मालिका आणि रिऍलिटी शो मधून समोर आलेली अभिनेत्री एबिगेल पांडे (Abigail Pande) हिला आपल्या एक टॉपलेस फोटोसाठी सुद्धा नेटकऱ्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. योगा व फिटनेस फ्रीक एबिगेल हिने काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून योग करत असतानाच एक फोटो पोस्ट केला होता, या फोटोमध्ये तिने पूर्णतः टॉपलेस होऊन पोझ दिली होती. पत्नी सान्या सागर सोबत 'प्रतिक बब्बर'चा बोल्ड अवतार; शेअर केला Topless Photo

पाहा Abigail ची Instagram पोस्ट

दरम्यान हा टॉपलेस फोटो पोस्ट करत असताना एबिगेल हिने भलीमोठी पोस्ट केली आहे, ज्यात खरंतर योगा आणि नग्नता यांचा परस्पर संबंध नसला तरी हे कॉम्बिनेशन बरेच हटके असल्याचे म्हंटले आहे. हा फोटो पोस्ट करणे हा माझ्या स्वातंत्र्याचा भाग असला तरी सुरुवातीला लाज, भीती अश्या संभ्रमात मी अडकले होते, अशी कबुलीही तिने दिली.  मात्र इंस्टाग्राम वरील @NudeYogaGirl या अकाउंट मुळे आपल्याला प्रेरणा मिळाली तर आपली मैत्रीण आश्का गोराडिया हिच्याकडून पाठिंबा मिळाला आणि त्यामुळेच आपण हे धाडस करू शकलो असे म्हंटले आहे. या पोस्टवरील नेटकऱ्यांची प्रतिक्रिया पाहता तिने लिहिलेल्या #NudeisNormal या हॅशटॅगचा समर्पक अर्थ पोहचत आहे.

यापूर्वी आश्का हिने देखील अशाच प्रकारे टॉपलेस होऊन फोटो पोस्ट केला होता, त्यावेळेस अनेकांनी तिची वाहवा केली होती.

आश्का गोराडिया पोस्ट

योग हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे, देश-विदेशात या व्यायाम प्रकाराला बरेचजण नेटाने फॉलो करतात. योगामुळे शरीराला आणि मनाला मुक्तता मिळून शांत वाटते, बहुदा नग्नावस्थेत योग करण्यामागे सुद्धा हाच हेतू असावा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif