Munawar Faruqui: मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा केलं लग्नं; जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन व ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकी याने दुसर लग्न केल्याची सध्या चर्चा आहे. जवळचे नातेवाईक व मित्र-मैत्रिणींच्या उपस्थित मुनव्वरने 10-12 दिवसांपूर्वी लग्न केल्याचं समजत आहे.

Munawar Faruqui: मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा केलं लग्नं; जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
Munawar Faruqui (PC - Instagram)

Munawar Faruqui: ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. आता तो त्याच्या वैयक्तिक कारणाने चर्चेत आहे. मुनव्वरने 10-12 दिवसांपूर्वी लग्न केल्याची सध्या चर्चा आहे. जवळचे काही नातेवाईक व मित्र-मैत्रिणी उपस्थित त्याचा लग्न सोहळा(Marriage) पार पडला अशी माहिती टाइम्स नाऊने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुनव्वरचा निकाह आयटीसी मराठा इथं पार पडला. गुपचूप लग्न केल्याने लग्नाचे फोटो किंवा लग्नाशी संबंधित कोणतीच माहिती त्याने शेअर केलेली नाही. मात्र, त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव एम वरून सुरू होत असल्याचे समजते आहे.(हेही वाचा:Munawar Faruqui Hospitalized: 'बिग बॉस 17' विजेता मुनवर फारुकी रुग्णालयात दाखल, प्रकृती पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता )

पोस्ट पहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoom TV (@zoomtv)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 27, 2024 02:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).