Mohit Raina As Mahadev Again: 'रामायण' चित्रपटात मोहित रैनाची एन्ट्री; साकारणार महादेवांची भूमीका

'देवों के देव... महादेव' फेम मोहित रैना पुन्हा एकदा महादेवाच्या अवतारात दिसणार आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाचया स्टार कास्टमध्ये ते सहभागी झाले आहेत.

Mohit Raina As Mahadev Again: 'रामायण' चित्रपटात मोहित रैनाची एन्ट्री; साकारणार महादेवांची भूमीका
PC-X

Mohit Raina As Mahadev Again: मोहित रैना पुन्हा एकदा महादेवांची (Lord Shiva) भूमीका साकारणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटात महादेवच्या भूमिकेसाठी मोहित रैनाला (Mohit Raina) कास्ट करण्यात आले आहे. यापूर्वी, मोहितला टेलिव्हिजनवर या भूमिकेने प्रचंड लोकप्रियता दिली आहे. 'रामायण' (Ramayana) चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारत आहे. तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यश या चित्रपटात रावणाच्या रूपात एका खलनायकाची भूमिका साकारत आहे.

'देवों के देव... महादेव' मध्ये मोहित रैनाने भगवान महादेवांची भूमिका साकारली होती. ती प्रेक्षकांना खूप आवडली. आता त्याला एका मेगा बजेट चित्रपटात हे पौराणिक पात्र साकारताना पाहणे प्रेक्षकांसाठी खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव बनू शकतो. असे म्हटले जात आहे की हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 2026 च्या दिवाळीत आणि दुसरा भाग 2027 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे बजेट सुमारे 835 कोटी असल्याचे म्हटले जाते, ज्यामुळे तो भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक बनू शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2025 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).