Ved Movie Extended Version: सत्या-श्रावणीच्या लव्ह सॉंग सह 20 जानेवारीपासून सिनेमागृहात पाहता येणार 'वेड' ची विस्तारित आवृत्ती; Riteish Deshmukh ची मोठी घोषणा
'वेड तुझं' हा सिनेमातील गाणं आता सत्या आणि श्रावणीवर देखील चित्रित करून सिनेमामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे रितेश-जिनिलिया या जोडीच्या प्रेक्षकांना सिनेमात त्यांचा रोमॅन्टिक अंदाज पाहता येणार आहे.
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वेड' (VED) मराठी सिनेमाला रसिकांची मोठी दाद मिळाली आहे. सैराटनंतर रेकॉर्डब्रेक कामगिरी करणारा हा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रेमाचा आदर करत आता 'वेड' सिनेमाची विस्तारित आवृत्ती प्रदर्शित होणार असल्याची माहिती रितेशने आज एका इंस्टाग्राम लाईव्ह मधून दिली आहे. सिनेमामध्ये 3 अधिकचे सीन आणि सत्या-श्रावणी यांचं लव्ह सॉंग आता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सत्या ची भूमिका रितेशने तर श्रावणी ची भूमिका जिनिलियाने साकारली आहे.
'वेड तुझं' हा सिनेमातील गाणं आता सत्या आणि श्रावणीवर देखील चित्रित करून सिनेमामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे रितेश-जिनिलिया या जोडीच्या प्रेक्षकांना सिनेमात त्यांचा रोमॅन्टिक अंदाज पाहता येणार आहे. 'वेड'ची ही विस्तारीत आवृत्ती 20 जानेवारी पासून सिनेमागृहात रिलीज होणार आहे. दरम्यान रसिकांसाठी पर्वणी म्हणजे 20 जानेवारी हा मुव्ही लव्हर्स डे असल्याने मोठ्या मल्टिप्लेक्स चेन मध्ये हा सिनेमा अवघ्या 99 रूपयांच्या तिकीटावर बघता येणार आहे. नक्की वाचा: Ved Film: 'वेड' चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; अभिनेत्री Genelia D'Souza ने मानले प्रेक्षकांचे आभार (Watch).
View this post on Instagram
वेड या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन रितेशनेच केलं आहे. तर जिनिलिया निर्माती आहे. सोबतच पहिल्यांदाच जिनिलिया मराठी सिनेमामध्येही 'वेड' च्या माध्यमातून आली आहे. अजय-अतुल म्युझिकल या सिनेमाला आहे. वेड सिनेमातील सार्याच गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एका गाण्यात पहिल्यांदाच दबंगस्टार सलमान खान देखील मराठी सिनेमामध्ये झळकला आहे. 30 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचं मागील 20 दिवसांमधील नेट कलेक्शन 52 कोटी तर ग्रॉस कलेक्शन 62 कोटीपर्यंत पोहचलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2023 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

