Bigg Boss Marathi 5: ‘घे पाऊल पुढे जरा’ गाण्यावर वर्षा उसगांवकर यांनी स्वप्निल जोशी आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यासोबत केला डान्स (Watch Video)
आम्ही सातपुते या चित्रपटातल्या ‘घे पाऊल पुढे जरा’ गाण्यावर वर्षा उसगांवकर स्वप्निल जोशी आणि सुप्रिया पिळगांवकरांसोबत डान्स करताना दिसत आहेत.
Bigg Boss Marathi 5: शनिवारी बिग बॉस घरातून संग्राम चौगुलेला बाहेर पडाव लागलं. त्याच्या हाताला दुखापत झाल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने बिग बॉसने हा निर्णय घेतला. त्यानंतर आजच्या भागात बिग बॉस घरात 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाचे कलाकार येणार आहेत. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar ),अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)आणि अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) बिग बॉस घरात हजेरी लावणार आहेत. बिग बॉसच्या घरात जेव्हा केव्हा पाहूणे येतात तेव्हा खूप धमाल-मस्तीचा माहोल पहायला मिळतो. (हेही वाचा: Sangram Chougule: संग्राम चौगुलेचा बिग बॉस मधला खेळ संपला; वैद्यकीय कारणामुळे घराबाहेर
)
बिग बॉसचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यात वर्षा उसगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यात डान्सची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. आम्ही सातपुते या चित्रपटातल्या ‘घे पाऊल पुढे जरा’ गाण्यावर वर्षा उसगांवकर स्वप्निल जोशी आणि सुप्रिया पिळगांवकरांसोबत डान्स करताना दिसत आहेत.
‘घे पाऊल पुढे जरा’ गाण्यावर डान्स
सुप्रिया पिळगांवकर आणि वर्षा उसगांवकर या दोघीही एकमेकींच्या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळणार आहेत. नीलेश साबळे म्हणतात, "सुप्रिया ताई तुमचं गाणं वाजल्यावर वर्षा ताई परफॉर्म करतील आणि वर्षाताईंच गाणं वाजलं की सुप्रिया ताई तुम्ही डान्स करायचा." यानंतर वर्षा ताई सुप्रिया पिळगांवकर यांच्या 'घे पाऊल पुढे जरा' या गाण्यावर डान्स करते. तर दुसरीकडे सुप्रिया पिळगांवकर वर्षा ताईंच्या 'मी आले…' या गाण्यावर भन्नाट डान्स करतात.