Sher Shivraj Trailer: दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 'हा' बॅालिवूडचा खलनायक साकारणार अफजल खानची भूमिका

तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी हे या चित्रपटामध्ये अफजल खानाची भूमिका साकारणार आहेत.

Sher Shivraj (Photo Credit - Instagram)

'पावनखिंड' (Pawankhind) या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांची टिम 'शेर शिवराज' (Sher Shivraj) हा नवा चित्रपट घेऊन सज्ज झाली आहे. शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान ठरावा असा अफजलखान वधाचा अध्याय २२ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाता ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर हा (Chinmay Mandlekar) 'शेर शिवराज' या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी (Mukesh Rishi) हे या चित्रपटामध्ये अफजल खानाची भूमिका साकारणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Rishi (@officialmukeshrishi)

इतिहासामध्ये अफजल खानाचं जे वर्णन करण्यात आलं आहे, त्यासाठी मुकेश ऋषी या भूमिकेसाठी चपखल आहेत. मुकेश ऋषी यांनी हिंदीबरोबरच तेलुगु, कन्नडा, मल्याळम, पंजाबी, भोजपुरी,तमिळ भाषांतील सिनेमात काम केलं आहे. तसंच मुकेश यांनी याआधी 'ट्रकभर स्वप्नं' या मराठी सिनेमातही काम केलं आहे. (हे देखील वाचा: Sher Shivraj मध्ये हा कलाकार साकारणार 'बहिर्जी नाईक' याची भूमिका)

अतिशय क्रूर, दगाबाज आणि शक्तिशाली अफजलखान म्हणजे स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट. विजापूरच्या सल्तनतेचा दक्षिणेकडे विस्तार करण्यात अफजलखानाची मोठी भूमिका होती. 'मै लाऊंगा शिवाजी को...! जिंदा या मुर्दा!', अशी वल्गना करत अफजलखान स्वराज्यावर चालून आला. युद्धरणनीतीमध्ये निष्णात आणि वेळप्रसंगी कट-कारस्थानं, दगाफटका करुन शत्रूला पराभूत करण्यात माहिर असलेला अफजलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला खरा पण शिवरायांच्या बुद्धिचातुर्यापुढे त्याचा निभाव लागू शकला नाही. हा सगळा पराक्रमी अध्याय २२ एप्रिलला आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.