Aatur Marathi Movie: राष्ट्रीय पुरस्कारविजेते शिवाजी लोटण-पाटील यांच्या आगामी चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री

शिवाजी लोटण-पाटील यांचं दिग्दर्शन असलेल्या 'धग' आणि 'भोंगा' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. शिवाजी लोटण-पाटील सारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळणं ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं प्रिती सांगते.

Aatur Marathi Movie

विविध जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या सौंदर्याची भुरळ पाडणा-या मॉडेल आणि अभिनेत्री प्रिती मल्लापूरकर (Preeti Mallapurkar) राष्ट्रीय पुरस्कारविजेते शिवाजी लोटण-पाटील (Shivaji Lotan Patil) यांच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवाजी लोटण-पाटील यांच्या आगामी 'आतुर' (Aatur) या चित्रपटातून त्यांची अभिनयाची कारकिर्द सुरु होत आहे. दिग्दर्शक शिवाजी लोटण-पाटील यांच्या अगोदरच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिल्याने या नव्या चित्रपटाबाबतही प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. दिग्दर्शक शिवाजी लोटण-पाटील यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मिळाली आहे. शिवाजी लोटण-पाटील यांचं दिग्दर्शन असलेल्या 'धग' आणि 'भोंगा' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. शिवाजी लोटण-पाटील सारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळणं ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं प्रिती सांगते.

मूळ उद्योजिका असलेल्या प्रिती मल्लापूरकर यांनी याअगोदर 'ईश्वरी' या चित्रपटातही काम केलं आहे. 'ईश्वरी' हा चित्रपट अद्यापही प्रदर्शित होणे प्रलंबित असले तरीही विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये या चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. ईश्वरी' या चित्रपटात प्रिती मल्लापूरकरने एका मूकबधिर मुलीची भूमिका साकारली आहे. संगीताची कास धरणा-या या मूकबधिर मूलीच्या भूमिकेत प्रीतीच्या अभिनयाला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाद मिळाली. दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रितीला तिच्या अभिनयासाठी विशेष पुरस्कारही मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preeti Mallapurkar (@preetimallapurkar)

ऑडिशनदरम्यान झाली ओळख

'आतुर' या चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान प्रितीची दिग्दर्शक शिवाजी-लोटण पाटील यांच्याशी ओळख झाली. ऑडिशनमध्ये एका फटक्यातच प्रितीला दिग्दर्शक शिवाजी लोटण-पाटील यांच्या चाणाक्ष नजरेने हेरलं. प्रितीकडून सहज येणारे हावभाव पाहत आपल्या आगामी चित्रपटासाठी प्रितीच योग्य असल्याचं शिवाजी लोटण-पाटील यांनी अचूकरित्या ओळखलं. दोनदा राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या दिग्दर्शकाकडे काम करण्याची संधी मिळणं, याबाबत काही दिवस विश्वासच बसत नव्हता, असं प्रिती सांगते. शुटिंगकाळातही शिवाजी लोटण-पाटील कलाकाराकून सहजरित्या अभिनय करवून घेण्यात तरबेज असल्याचं प्रितीनं सांगितलं. भूमिकेच्या तयारीसाठी वर्कशॉपवर त्याचा विश्वास नाही. सहज भूमिकेत शिरण्यासाठी शिवाजी लोटण-पाटील यांचं दिग्दर्शनही पुरेसं असल्याचा विश्वासही प्रितीने व्यक्त केला. (हे देखील वाचा: Vishu Marathi Movie: निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी)

गृहिणीची भूमिका साकारत आहेत

'आतुर' या चित्रपटात प्रिती एका गृहिणीची भूमिका साकारत आहे. आपल्याला मूल हवं म्हणून धडपडणा-या एका मध्यमवर्गीय जोडप्याची कथा 'आतुर' या चित्रपटात मांडण्यात आलीय. पंधरा दिवस या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं. चित्रपटाची संपूर्ण टीम मला सहकार्य करत होती. त्यामुळे शुटींगमध्ये कोणताही व्यत्य आला नाही. भूमिकेतही मला माझं शंभर टक्के देता आलं, असे प्रिती सांगते. प्रिती आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये सध्या बिझी आहे. पण याबाबतीत योग्यवेळीच मी स्वतःहून माहिती देईल, असेही तिने सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now