Rinku Rajguru Stuck in London: अभिनेत्री रिंकू राजगुरुसह ‘छूमंतर’ चित्रपटाची टीम लंडनमध्ये अडकली

तसेच भारताने 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा बंद केल्या आहेत. याचा फटना रिंकू आणि संपूर्ण ‘छूमंतर’ चित्रपटाच्या टीमला बसला आहे.

Rinku Rajguru (PC - Instagram)

Rinku Rajguru Stuck in London: मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि ‘छूमंतर’ सिनेमाची टीम सध्या लंडनमध्ये अडकली आहे. रिंकू गेल्या काही दिवसांपूर्वी ‘छूमंतर’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंग्लंडला गेली होती. मात्र, नव्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच भारताने 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा बंद केल्या आहेत. याचा फटना रिंकू आणि संपूर्ण ‘छूमंतर’ चित्रपटाच्या टीमला बसला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये 'छूमंतर’ सिनेमाचे शुटिंग सुरू आहे. 'छूमंतर’ चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. या चित्रपटात प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना, बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे हे सर्व कलाकारदेखील लंडनमध्ये अडकले आहेत. (हेही वाचा - Sai Lokur च्या तालावर अखेर नाचला तिचा पती तीर्थदिप रॉय, पाहा दोघांचा 'जवा नवीन पोपट हाय' गाण्यावरील मजेशीर डान्स, Watch Video)

विशेष म्हणजे रिंकू पहिल्यांदाच भारत सोडून दुसऱ्या देशात शुटिंगसाठी गेली आहे. या चित्रपटाच्या लंडनमध्ये होणाऱ्या शुटिंगसाठी मी अतिशय उत्सुक आहे. आम्ही कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करत आहोत, असंही रिंकूने माध्यमांना सांगितलं होतं. लंडनमध्ये गेल्यानंतर रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत: चे फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा नव्या विषाणू अधिक घातक असून त्याचा प्रादुर्भावदेखील अधिक जलद गतीने होतो, असं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे योग्य खबरदारी घेणं गरजेचं असल्याचंही सरकारकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.



संबंधित बातम्या