Sonalee Kulkarni चा कोल्हापुरी ठसका! कोल्हापुरी साज आणि चप्पला मध्ये खुललेले हिरकणीचे सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ
गुलाबी रंगाची साडी,केसांचा अंबाडा, त्यात माळलेला गजरा, गळ्यात कोल्हापुरी साज, पायात कोल्हापुरी चपला असा सोनालीने साजश्रृंगार केला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची हिरकणी सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने आपल्या अभिनय, सौंदर्याच्या जोरावर अनेकांवर मोहिनी घातली आहे. यामुळे महाराष्ट्रात तिने स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोनाली कुलकर्णी हिचा 'अप्सरा आली' या गाण्यावर अप्रतिम नृत्य आजही लोकांच्या स्मरणात आहे. नितळ त्वचा, निळे डोळे, कमनीय बांधा अशी सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीने नुकताच आपल्या कोल्हापुरी साजश्रृंगारातील फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. कोणालाही घायाळ करेल असा सोनालीचा कोल्हापुरी साज आणि चप्पल घातलेला लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
गुलाबी रंगाची साडी,केसांचा अंबाडा, त्यात माळलेला गजरा, गळ्यात कोल्हापुरी साज, पायात कोल्हापुरी चपला असा सोनालीने साजश्रृंगार केला आहे.
पाहा फोटोज
सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममता हिची भूमिका केली.तसेच अजय देवगण याच्या 'सिंघम 2' ह्या चित्रपटात देखील सोनाली ने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती.
नुकताच तिने आपला कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्याशी साखरपुडा झाल्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधीच म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सोनाली आणि कुणाल ने कुटुंबियांच्या उपस्थितीत दुबईमध्ये (Dubai) साखरपुडा करून घेतला.