गायिका वैशाली माडे येत्या 31 मार्चला राष्ट्रवादीत करणार प्रवेश
येत्या 31 मार्च गायिका राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असून मुंबईतील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे (Vaishali Made) आता राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. येत्या 31 मार्च गायिका राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असून मुंबईतील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. वैशाली माडे ने'बाजीराव मस्तानी' चित्रपटात गायलेले 'पिंगा' गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. त्याचप्रमाणे मराठीतही तिने अनेक हिट्स गाणी दिली. त्याचबरोबर अनेक मराठी मालिकांची गाणी देखील तिने गायली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड निर्माण केला आहे.
येत्या 31 मार्चला मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात वैशाली माडे पक्षप्रवेश करणार आहे. दुपारी 12 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा' ही माहिती दिलीय.हेदेखील वाचा- Urmila Matondkar Joins Shiv Sena: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांंचा 'मातोश्री' वर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश
वैशाली माडे या 2008 मध्ये 'झी मराठी'च्या मराठी 'सा रे ग म प'च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्यात. हाच त्यांच्या आयुष्याचा 'टर्निंग पाँईंट' ठरला. येथून पुढे 2009 मध्ये त्यांनी 'झी'च्या हिंदी 'सा रे ग म प'मध्ये आपलं नशिब आजमावलं. यात त्या सौमेन नंदी, यशिता यशपाल यांच्यासह 'टॉप थ्री'मध्ये पोहोचल्यात. पुढे आपल्या जादूई आवाजाच्या बळावर त्यांनी 'सा रे ग म प' च्या हिंदी पर्वातही बाजी मारत संगीत जगताला आपल्या अस्तित्व आणि कर्तृत्वाची जाणीव करून दिली.
त्यानंतर मराठी बिग बॉसमध्येही ती प्रचंड चर्चेत आली होती. त्यात तिच्या खाजगी आयुष्याबद्दलही बरीच माहिती समोर आली होती. वैशाली यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत.