पुणे: ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

ते 88 वर्षांचे होते

Jayram Kulkarni (Photo Credits: Youtube)

नवरी मिळे नवऱ्याला, झपाटलेला, दे दणा दण अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते जयराम कुलकर्णी (Jayram Kulkarni) यांचे आज वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशनाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मराठी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेकदा श्रीमंत वडिलांच्या,पोलिसांच्या भूमिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. झी मराठीवर सुरु झालेली नवी मालिका माझा होशील ना मधून नुकतेच जयराम कुलकर्णी यांच्या नातवाने म्हणजेच विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) यांनी सुद्धा अभिनयात आपल्या करिअरला सुरुवात केली आहे तर प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांचे ते सासरे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा सिनेमा खेळ आयुष्याचा (Khel Ayushyacha) प्रदर्शित झाला होता, दुर्दैवाने हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

ANI ट्विट

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे जयराम कुलकर्णी यांचे जन्मस्थान, शिक्षणाचे जेमतेम काही वर्षे तिथे काढून त्यांनी पुढील शिक्षणसाठे पुणे येथील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. यावेळची श्रीकांत मोघे, शरद तळवलकर ही समवयीन विद्यार्थी मंडळीआणि जयराम यांची मैत्री झाली होती. यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. 1956 साली आकाशवाणी पुणे केंद्रात त्यांनी नोकरी केली.

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन - Watch Video

तर अभिनयाची आवड लहानपणापासूनच असल्याने इयत्ता सहावीत असताना त्यांनी मोरूची मावशी या नाटकात मावशीची प्रमुख भूमिका साकारली होती. आजतायागयत अनेक चित्रपटात त्यांनी दिग्गज मंडळींसोबत काम केले होते, या यादीत, 'खट्याळ सासू नाठाळ सून', 'माझा पती करोडपती', 'अशी ही बनवाबनवी', 'थरथराट', 'भुताचा भाऊ', 'आयत्या घरात घरोबा', 'धुमधडाका', 'झपाटलेला' यासारख्या मोठ्या आणि गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.