Sai Lokur च्या तालावर अखेर नाचला तिचा पती तीर्थदिप रॉय, पाहा दोघांचा 'जवा नवीन पोपट हाय' गाण्यावरील मजेशीर डान्स, Watch Video
सईने देखील तसच काहीस केलं आहे. पण थोड्या हटके आणि मजेशीर पद्धतीने..
बिग बॉस मराठी 1 (Bigg Boss Marathi 1) ची स्पर्धक सई लोकुर (Sai Lokur) ही या कार्यक्रमानंतर बरीच चर्चेत आली. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड वाढला. त्यामुळे तिचे लग्न झाल्यानंतरही तिचे प्रत्येक फोटोज आणि व्हिडिओज पाहण्यासाठी तिचे चाहते प्रचंड आतुर असतात. तिच्या लग्नाइतकेच लग्नाआधीचे, बॅचलर पार्टी, साखरपुड्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यात आता तिने एका नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या पती तीर्थदिप रॉयसोबत (Tirthdeep Roy) सुप्रसिद्ध मराठी गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांच्या सुपरहिट गाणे 'जवा नवीन पोपट हाय' वर नाच करताना दिसत आहे.
असं म्हणतात लग्न झाल्यावर पुरुष बायकांच्या तालावर नाचतात. सईने देखील तसच काहीस केलं आहे. पण थोड्या हटके आणि मजेशीर पद्धतीने...हेदेखील वाचा- Sai Lokur Engagement Photos: सई लोकूर चा झाला अखेर साखरपुडा, कोण आहे सईचा जोडीदार, पाहा या सोहळ्याचे सुंदर फोटोज
पाहा व्हिडिओ
सई लोकुर आपल्या संसारात छान रमली असून तिने लग्नानंतरचे आपले पोस्ट फोटोशूटही केले आहे. यात तिने नुकतेच आपल्या पती तीर्थदिपसोबत नाइट ड्रेसमधील (Sai Lokur-Tirthdeep Roy Night Suit Photos) फोटोज शेअर केले आहेत. यात हे जोडपं खूपच क्युट दिसत आहे. या फोटोमध्ये सई आणि तीर्थदिपने अंतरंगी हावभाव देखील दिले आहेत.
सई लोकूर बिग बॉस आधी 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील झळकली होती. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती.