Video: चाहत्यांनी पाठवलेला केक कापून Sachin Supriya Pilgaonkar यांनी हटके स्टाईलने साजरा केला वाढदिवस, पाहा व्हिडिओ
आज १७ ऑगस्ट रोजी मराठी चित्रपटसृष्टीतली लाकडी जोडी सचिन- सुप्रिया पिळगांवकर यांचा आज वाढदिवस आहे. इन्स्टाग्रामच्या अधिकृत अंकाऊटवर वाढदिवसाचा खास व्हिडिओ शेअर केला आहे.
Sachin Supriya Pilgaonkar Birthday Celebration: आज 17 ऑगस्ट रोजी मराठी चित्रपटसृष्टीतली लाकडी जोडी सचिन- सुप्रिया पिळगांवकर यांचा आज वाढदिवस आहे. इन्स्टाग्रामच्या अधिकृत अंकाऊटवर वाढदिवसाचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. दोघांन्ही केक कापत वाढदिवस साजरा केला आहे. तर त्यांची मुलगी श्रेया हीनं हा व्हिडिओ शूट केला. व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहे. ही जोडी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात प्रसिध्द आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटातून दोघांन्ही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. नुकताच नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिध्द झाला आहे. (हेही वाचा- नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच)
सचिन पिळगांवकर यांनी मराठी चित्रपटासोबत हिंदी, भोजपूरी चित्रपटात अभिनयाचे काम केले. कलाकार म्हणून प्रसिध्द तर आहेत. सोबत निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत काम केले. अगदी पाच वर्षापासून ते चित्रपटात कामाची सुरवात केली. सचिन यांना वयाच्या ५व्या वर्षी बालकलाकारासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
View this post on Instagram
अभिनयाचे अष्टपैले असलेले सचिन यांनी प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यांनी आता पर्यत १००हून अधिक चित्रपटात काम केले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही चाहत्यांनी रात्रीचे १२ वाजता त्यांना केक पाठला होता. हा केक कापून त्यांना वाढदिवस साजरा केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 2024 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

