Navra Maza Navsacha 2 On OTT: चित्रपटगृह गाजवल्यानंतर ‘नवरा माझा नवसाचा 2’ ओटीटीवर घालणार धुमाकूळ; 'इथे' पाहता येणार सिनेमा
यासंदर्भात सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच पोस्ट केली आहे.
Navra Maza Navsacha 2 On OTT: सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) निर्मित, दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा 2’ (Navra Maza Navsacha 2) 20 सप्टेंबरला प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळाली. या चित्रपटाची घोषणा होताच सोशल मीडियावर ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील मजेशीर डायलॉग, गाणी व्हायरल झाली होती. तब्बल 19 वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाचा सिक्वल आला होता.
चित्रपटाचं बजेट ८ कोटींच्या आसपास होतं. हे बजेट चित्रपटाने फक्त चार दिवसांत वसूल केलं आहे. आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. यासंदर्भात सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच पोस्ट केली आहे. आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपट ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहात देखील सुरू आहे, असं सचिन पिळगांवकरांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितलं आहे.
प्रदर्शित होताच चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.86 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2.43 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 3.55 कोटींचा गल्ला ‘नवरा माझा नवसाचा 2’ने जमवला. मग या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदोड पाहायला मिळाली.
‘नवरा माझा नवसाचा 2’ ओटीटीवर घालणार धुमाकूळ
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, विजय पाटकर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळाली. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे.