Riteish Deshmukh आगामी मराठी थ्रिलर सिनेमा Adrushya मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत; मंजिरी फडणीस, पुष्कर जोग प्रमुख भूमिकेत

पुष्कर जोग, मंजिरी फडणीस यांच्यासह सौरभ गोखले, अनंत जोग, अजय कुमार सिंह हे कलाकार 'अदृश्य' मध्ये झळकणार आहेत.

अदृश्य । PC: Instgaram/ Pushkar Jog

माऊली, लय भारी नंतर आता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) 'अदृश्य' या नव्या मराठी थ्रिलर सिनेमामधून रसिकांच्या भेटीला येणार आहे.या सिनेमामध्ये रितेशच्या सोबतीला अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री मंजिरी फडणीस असणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कबीर लाल सांभाळणार आहेत. कबीर यांनीच रितेशचा पहिला सिनेमा 'तुझे मेरी कसम' या सिनेमात सिनेमॅटोग्राफरची धुरा सांभाळली होती. त्यामुळे कबीर लाल आणि रितेश देखील 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच पुन्हा एकत्र काम करणार आहेत. पण आता कबीर दिग्दर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत. Ashadhi Ekadashi 2021: अभिनेता Riteish Deshmukh ने दिल्या आषाढी एकादशी च्या खास अंदाजात शुभेच्छा.

पुष्कर जोग, मंजिरी फडणीस यांच्यासह सौरभ गोखले, अनंत जोग, अजय कुमार सिंह हे कलाकार 'अदृश्य' मध्ये झळकणार आहेत. साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅट्रोग्राफीची धुरा सांभाळली आहे तर लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे. चित्रपटाच शूटिंग पूर्ण झाले असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुष्कर जोग इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

रितेश देशमुख लवकरक नागराज मंजुळे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 3 सीरीज मधील चित्रपटाचा एक भाग असणार आहेत. यामध्ये शिवरायांच्या भूमिकेत रितेश झळकण्याची शक्यता आहे.