पुणे: अभिनेता मंदार कुलकर्णी याला फोटो शूट करताना विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक

शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेत व लग्नबंबाळ या व्यावसायिक नाटकातून समोर आलेलं नाव मंदार कुलकर्णी याला नुकते डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.मंदार वर एका अल्पवयीन विद्यार्थिनीला नाटकात काम देण्याचे आश्वासन देऊन लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोप होता

Mandar Kulkarni (Photo Credits: Facebook)

शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेत व लग्नबंबाळ या व्यावसायिक नाटकातून समोर आलेलं नाव मंदार कुलकर्णी (Mandar Kulkarni)  याला नुकते डेक्कन पोलिसांनी (Deccan Police) बेड्या ठोकल्या आहेत.मंदार वर एका अल्पवयीन विद्यार्थिनीला नाटकात काम देण्याचे आश्वासन देऊन लैंगिक छळ (Sexual Harassement) केल्याप्रकरणी आरोप होता. पुण्यातील प्रभात रोड (Prabhat Road) येथे ही घटना घडली असून मंदारने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने बिकिनीमध्ये फोटो काढायला लावल्याचा आरोप पीडित मुलीने केला होता यासंदर्भात तिने 23 ऑगस्ट रोजी डेक्कन पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.

प्राप्त माहितीनुसार, पीडीत विद्यार्थिनी ही हौशी कलाकार असल्याने आपली नाटकाची आवड जपण्यासाठी तिने एका अभिनय शिबिरात सहभाग घेतला होता. यावर्षी जानेवारी महिन्यात शनिवार पेठ येथे मंदार घेत असलेल्या शिबिरात त्यांची ओळख झाली. मंदारने तिला एका नाटकाच्या ऑडिशनसाठी फोटोशूट करून घेण्यास सांगितले यासाठी त्याने तिला प्रभात रोडवरील बसंत बहार अपार्टमेंटमध्ये येण्यास सांगितले.

यानुसार ही पीडिता सांगितल्या ठिकाणी गेल्यावर मंदारने तिला वेगवेगळ्या पाच कपड्यांमध्ये फोटो काढणार असल्याचे सांगितले, मात्र तीन ड्रेस बदलून झाल्यावर त्याने तिला आपण तुझे बिकिनी मध्ये फोटो काढू असे सांगितले. यामुळे ही विद्यार्थिनी गांगरून गेली आणि तिने मंदारला नकार दिला. मात्र तिला न जुमानता मंदारने तिला जबरदस्ती बिकिनी घालायला लावली व तिचे फोटो काढले. तसेच या विषयी कोणालाही सांगू नकोस अशा शब्दात धमकावले.

दरम्यान, पीडित मुलीने याबदल पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर मंदार कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.